विचार हेच संस्कार..

 

काल एक मुलाखत ऐकण्यात आली.. एक अभिनेत्री सांगत होती , मी माझ्या मुलाला दर आठवड्याला नवीन कपडे घेते आणि तेही ब्रॅंडेड घेते.. तो मागत नाही , त्याची ती डिमांड नाही आणि तो लहान असल्याने त्याला काहीही कळत नाही पण त्याच्या शाळेत सगळ्याना माहित आहे की त्याची आई ॲक्ट्रेस आहे त्यामुळे त्याने त्या स्टॅंडर्डनेच राहायला हवं असं मला वाटतं म्हणुन मीच हे करते .. हे बोलताना तिच्यात असलेला गर्व , अहंकार दिसत होता पण तिचे हे विचार तिच्या मुलावर संस्कार करणार असतात हे ती विसरली कारण अभिनेत्रीचा मुलगा हा कपड्यावरुन ओळखला जाणार नसून तो त्याच्या विचाराने , संस्काराने , वागण्याने , अभ्यासाने ओळखला जायला हवा.. कपडे हे फक्त अंग झाकण्यासाठी असतात आणि विचार हे संपूर्ण आयुष्य घडवत असतात.. अभिनेत्री म्हणजे जगावेगळी नाही .. इतर कामासारखं तेही एक काम आहे.. आणि आताच या वयात त्याला अशा उधळाउधळी करायची सवय लावली आणि काही कारणाने त्याला पुढे जाऊन ते मेंटेन करायला जमलं नाही तर त्याच्या मनाची अवस्था काय होइल याचा विचार आताच या वयात पालकांनी करायला हवा.. लक्झरी आणि श्रीमंती ही कपड्यात नसून विचारात हवी.. खरच खुप पैसे असतील तर तिने त्याला दान करायची सवय लावावी.. बाहेर गरीब कसे रहातात याची जाणीव करुन द्यावी..

चांगली पुस्तके विकत घेउन द्यावीत.. त्याच्याकडे असलेल्या कला डेव्हलप करायला त्याला मदत करावी.. त्याने वयाने मोठ्या असलेल्या लोकांशी कसं वागावं हे सांगावं.. निसर्गात नेउन त्याचं महतव पटवुन द्यावं.. तो पैसा त्याच्या भविष्यासाठी सिक्युअर करुन ठेवावा आणि इतर आईसारखीच मीही आहे ही जाणीव त्याला आताच या वयात करुन द्यावी .. आपल्याला माहीत आहेच की अति लाडाने मुलं वाया जातात.. आणि जवळपास बऱ्याच आई या चुकीच्या गोष्टीसाठी मुलाला पाठीशी घालतात आणि हिच मुलं मोठी झाल्यावर पालकांचं ऐकत नाहीत.. अति लाडाने किवा भरपूर पॉकेट मनीची सवय लागल्याने ते व्यसनांच्या आहारी जातात.. आणि त्यातून पुढे जाऊन अतिप्रसंग घडतात .. पैसा जितका चांगला तितका वाईट ..

त्याचा उपयोग कधी आणि कसा करतो यावर त्याची जडणघडण ठरते.. पालक माज दाखवत असतील तर मुलही तशीच होणार म्हणून आपण जेव्हा समाजापुढे आयडॉल असतो तेव्हा आपले विचारही तितकेच ताकदवान असायला हवेत.. या कलियुगात लोक वाईट वृत्तीलाच फॉलो करतात.. चांगलं काय किवा वाईट काय हे विचार करण्याची क्षमताच नाहीशी झाली आहे… पि हळद हो गोरी हा जमाना असल्याने त्या हळदीत विष आहे हेही लोकांना ओळखु येत नाही.. आणि आंधळेपणाने फॉलो करुन लोक देवावरही विश्वास ठेवायला तयार नाहीत.. पालकांनी सर्वार्थाने बदलण्याची गरज आहे हे मात्र नक्की..
सोच बदलो.. देश बदलेगा..

#SonalSachinGodbole

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *