अहमदपूर ( प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या देवकरा येथे काल दि 23 सप्टें 24 रोजी टी बी हरेल आणि देश जिंकेल या मोहिमेअंतर्गत प्रोढ बीसीजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव तर्फे ही प्रोढ बीसीजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
या कामी आरोग्य सहाय्यक बिराजदार डी डी, आरोग्य सहाय्यक इब्राहिम शेख आणि आरोग्य सेवक बालाजीराव घुले यांनी पुढाकार घेतला. आरोग्य सेविका आणि आशा वर्कर श्रीमती मुंडे वाय एच, आशा वर्कर ज्ञानेश्वरी मा फड आणि वंदना ज गुट्टे यांनी परिश्रम घेतले. दरम्यान कै शं गु ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरीचे प्रा वसंतराव डावरे, प्रा मुंडे गोविंदराव, प्रा डॉ रमाकांत गजलवार, प्रा जंगिटवार व्ही आर आणि प्रा भगवान आमलापुरे यांनी प्रोढ बीसीजी लसीकरण मोहीमेत हिरीरीने सहभाग घेतला.