मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे युटयूबवर थेट प्रक्षेपण▪ नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन


नांदेड, (जिमाका) दि. 16

:- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे #पालकमंत्री #अशोक_चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. सकाळी 8.30 वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील हुतात्मा स्मृती स्तंभास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण व 9 वाजता ध्वजारोहण होईल. यावर्षी कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेवून नागरिकांना घरी बसूनच हा कार्यक्रम पहाता यावा यासाठी युटयूबवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. युटयूबच्या या 

https://youtu.be/dvgQB_x-DaY या लिंकवर हा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

yugsakshilive.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *