स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती : १७सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसग्राम


                   १५आॅगस्ट१९४७रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले खरं,परंतु दक्षिण भारताच्या तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैद्राबादला स्वातंत्र्याचा उपभोग घेता आला नाही.कारण,स्वातंत्र्य मीळाल्यावरही संस्थानाच्या सामिलीकरणाचे सर्व प्रयत्न निझाम-रिझवी यांनी अक्षरक्षा उधळून लावले होते.

भारतदेश स्वातंत्र्य झाला तरी हैद्राबाद संस्थानात निजामशाहीने अशी विचित्र अवस्था करुन ठेवली होती.मुक्तिसंग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अत्याचार करण्याचे  प्रमाण वाढवले होते.निझामाच्या राजवटीची पाठराखण करणा-या रझाकाराला संपण्यासाठी सशस्त्रलढा उभारणे अत्यंत आवश्यक वाटूलागले म्हणूनच आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या कानाकोप-यातून स्वातंत्र्यवीर समोर आले.

निझामसरकारच्या शोषणव्यस्थेविरुध्द व्यंकटेश खेडगीकर उर्फ #स्वामी_रामानंद_तीर्थ यांनी १९२९पासून #राष्ट्रीय शाळा_”हिप्परगे येथून निजाम सरकारविरूध्द संघटन बांधणी सूरु केली.१९३८मध्ये स्वामी रामानंदतीर्थ यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली.निजामाने या संघटेनवर बंदी घातली.तेव्हा लोकशाहीच्या हक्कांसाठी लढा उभारत या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले.
या कार्यात त्यांना नारायण रेड्डी,सिराझ-उल-हसन तिरमिजी,बाबासाहेब परांजपे,अनंत भालेराव,आशाताई वाघमारे यांचे सहकार्य लाभले.पी.व्ही.नरसिंहराव आणि #गोविंदभाई_श्राॅफ हे स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी होते.या रणसंग्रामात   कम्युनिस्ट,आर्यसमाज,हिंदूमहासभा,तसेच वेगवेगळ्या संघटनांचे समर्थन लाभले.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा लढा धर्मनिरपेक्ष होता.या मध्ये उघड उघड कार्य करणारे काही #स्वातंत्र्यसेनानी_ होते तर काही “भुमिगत”राहून कार्य करणारे लढव्वये होते.या लढ्यात स्त्रीयांचे योगदानही महत्वपूर्ण ठरले.ज्यांची नावे इतिहासाला आजही अज्ञात आहेत. 

       स्वामी रामानंद तीर्थ यांच्या लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणा-या मुस्लिमबांधवावर देखिल अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढले होते.सर्व जनता या अत्याचाराने त्रस्त होती.निजामशाहाला भारत सरकारने समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण,त्याचा काहीही परिणाम होत नव्हता.सारे प्रयत्न करून झाल्यावर अखेरीस भारत सरकारने १३सप्टेंबर १९४८रोजी निजामाविरुध्द पोलिस कारवाई केली या कारवाईला”आॅपरेशन पोलो”हे नाव दिले,आणि ते यशस्वी झाले.

शेवटी१७सप्टेंबर १९४८रोजी निजाम भारतसरकारला शरण आला.हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले.आणि ख-या आर्थाने स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती झाली आणि आपला भारतदेश परिपूर्ण झाला.पण,हैद्राबाद मुक्तिसंग्रामात वेदप्रकाश,श्यामलाल,बहिर्जी शिंदे,श्रीधर वर्तक,गोविंद पानसरे,शोएब उल्ला खान,जर्नादन मामा यांना हौतात्म्य आले.या सर्व ज्ञात-अज्ञात वीरशहिदांना विनम्र अभिवादन..!


रुपाली वागरे/वैद्य.नांदेड९८६०२७६२४१

One thought on “स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती : १७सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *