*खादी खरेदी वरील २०% रिबेटचा संजय भोसीकर यांच्या हस्ते शुभारंभ** खादी प्रेमीनी मोठ्या प्रमाणात खरेदी करावी संजय भोसीकर

 

कंधार प्रतिनिधी

*दिनांक 02/ऑक्टोबर*

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खादी ग्रामोद्योग समिती नांदेड च्या वतीने २ ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त खादी उत्पादनावर २०% रिबेट देण्यात येते या रिबेट चा शुभारंभ कंधार येथे संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला खादी भंडार कंधार येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन,पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन खादी खरेदी वरील २०% रिबेट चा शुभारंभ,लोहा कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला,

यावेळी माजी नगरसेवक शहाजी नळगे, सरपंच बालाप्रसाद पाटील मानसपुरे,मारोती पाटील लाडेकर,वैजनाथ जक्कलवाड गणेश गोरे,स्वप्निल परोडवाड,ॲड हनमंत कुट्टे,व्यवस्थापक प्रफ्फूल भागानगरे,माकन चन्नावार,माधव पाटील गव्हाने,विठ्ठल गिरी महाराज आदी सह खादी प्रेमी उपस्थित होते,

कंधार येथील भांडार मध्ये विविध खादीचे उत्पादने ठेवण्यात आले असून यामध्ये खादीचे शर्ट व पॅंट चे कापड रेडिमेड शर्ट पँट सुटिंग जॅकेट राष्ट्रध्वज टॉवेल लुंगी चादर सतरंजी इत्यादी उपलब्ध आहेत या उत्पादनाची खरेदी करुन २०% रिबेट चा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी असे आवाहन संजय भोसीकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *