जात पडताळणी कार्यालयात, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ‘अहिंसा परमो धर्म:’ या तत्वाखाली देशवासियांना संघटित करून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. सत्य व अहिंसेच्या मार्गाने भारताला आत्मनिर्भर होण्याची दिशा दाखवणाऱ्या महात्मा गांधीजींना आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांनी अत्यंत बिकट व कठीण परिस्थितीत देशाची सूत्र हाताळली.
पंतप्रधान पदाच्या आपल्या छोट्या कारकिर्दीतही त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी केली. ‘जय जवान, जय किसान’ हा क्रांतीकारी नारा देऊन भारतीय सैन्याचे व शेतकऱ्यांचे मनोबल वाढवणाऱ्या लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी, दिनांक 02 आक्टोबर 2024 रोजी. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक श्री. विजय कुरील यांच्या हस्ते करण्यात आले. आणि कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी, सिद्राम रणभिरकर, सोनू दरेगावकर, बाबू कांबळे, मनोज वाघमारे, रोहन देशमुख, निलेश वायकोस यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *