मुखेड:
केंद्रीय प्रा.शा. मुखेड केंद्रातील जि.प.प्रा.शाळा शिकारा येथील विद्यार्थी प्रिय शिक्षीका सौ.कमल गंगाराम घोडके-मेनकुदळे ह्या नियतवयोमानाने नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या.
शिकारा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच श्रीमती रसिकाबाई बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मुखेडचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी कैलास होणधरणे, शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कदम, प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.शिवाजी कराळे, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, शिक्षक नेते दिलीप देवकांबळे, सी पी एस चे मुख्याध्यापक डी.सी. बनसोडे, उपसरपंच शितलकुमार इमडे, मुख्याध्यापक श्रीपत राठोड व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकताच सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला. सौ.कमल घोडके-मेनकुदळे यांचा सहपतीक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कदम यांनी सत्कार मुर्तीच्या कार्याचा गौरव पुर्ण उल्लेख आपल्या मनोगतातून केला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थीनी आपल्या आवडत्या शिक्षीका विषयी मनोगत व्यक्त केले. सौ. कमल घोडके-मेनकुदळे यांनी आपल्या कार्यकाळात ) विद्यार्थ्यासमोर एक वेगळा ठसा उमटविला. एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांचा तालुक्यात नावलौकिक आहे. शैक्षणिक कार्य करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करून गुणवत्ता वाढवण्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पंचायत समिती तर्फे त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या सेवापूर्ती बद्दल माजी आमदार अविनाशराव घाटे, प्राचार्य मनोहर तोटरे, मुख्याध्यापक एस.डी. केरुरे, पत्रकार दादाराव आगलावे, रत्नाकर मोरे, व्यंकटराव पाटील, नागनाथ वजीरे, प्रवीण नाईक, संतोष तलेगावे, विजय पाटील, महेश शेवाळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बस्वराज साधू तर आभार नारायण ग्यादलवाड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र संकुलातील व जि. प. प्रा. शिकारा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.