नांदेड;
बुधवार 16 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 255 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत तर 325 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अहवालात एकुण 9 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
आजच्या एकुण 918 अहवालापैकी 617 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 12 हजार 437 एवढी झाली असून यातील 8 हजार 234 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 810 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
या अहवालात एकुण 9 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे रविवार 13 सप्टेंबर रोजी साखोजीनगर नांदेड येथील 52 वर्षाचा एक पुरुष, सोमवार 14 सप्टेंबर रोजी चिवळी मुखेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बसवंतनगर नांदेड येथील 24 वर्षाची एका महिलेचा, बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील 40 वर्षाच्या एका महिलेचा, मंगळवार 15 सप्टेंबर रोजी धानोरा ता. धर्माबाद येथील 55 वर्षाची एक महिला, बुधवार 16 सप्टेंबर रोजी राधिकानगर नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष,
दिनांक 15 सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल वजिराबाद नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, दिनांक 16 सप्टेंबर रोजी धानोरा ता. नायगाव येथील 70 वर्षाची एक महिला, गोकुंदा किनवट येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा यात समावेश आहे. उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 330 झाली आहे.
#Nanded #नांदेड