माहुर ;
साप म्हटलं की अंगावर काटे उभे राहतात पण सर्पमित्र म्हणून जे कठीण प्रसंगी आपला जीव धोक्यात टाकून सापाला न मारता त्याला जिवंत पकडून जीवनदान देणे हे एक मोठे कठीण काम काही सर्पमित्र समाजात काम करतात,
असाच एक प्रसंग दि. १३ सप्टेंबर रोजी जय योगेश्वर ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी पाहायला मिळाला ट्रेडिंग कंपनी च्या कामगारासाठी बांधण्यात आलेल्या घराच्या एका खोलीमध्ये एक भला मोठा धामण या जातीचा साप काही स्थानिक कामगाराने पाहिला व त्या ठिकाणी अनेकांनी आरडा ओरड सुरू केली.
अशातच युवा उद्योजक जय योगेश्वर ट्रेडिंग कंपनीचे मालक अतिष गेंटलवार यांनी येथील ज्येष्ठ पत्रकार तथा सर्पमित्र सुभाष खडसे यांना फोन करून साप असल्याची सूचना दिली. सर्पमित्र सुभाष खडसे यांनी कुठलाही विलंब न घेता तात्काळ जय योगेश्वर ट्रेडिंग कंपणी गाठून सुमारे आठ फूट लांब धामण जातीच्या सर्पाला पोत्यात जेरबंद केले,
व नजीक असलेल्या तुळशी शिवारात असलेल्या जंगलात सोडून देऊन जीवदान दिले.