स्वच्छतेचा नारा देणाऱ्या शहरात घाणीचे साम्राज्य* *मुख्य रस्त्यावरील कचऱ्यातून नागरिकांना करावे लागत आहे येणे जाणे*

 

*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*

ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये कंधार नगर परिषद शहरातील नागरिकाच्या आरोग्य सोबत खेळत असून मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.ग्रामीण भागातील नागरिक सणासुदीची खरेदी करण्यासाठी शहरात दाखल होत असून या दुर्गंधी कचऱ्यामुळे नागरिकाचे बेहाल होताना दिसत आहेत.

शहरातील मुख्य बाजारपेठेत एकीकडे दसऱ्यानिमित्त फुलांची विक्री तर दुसऱ्या बाजूला गटारातील वर पडलेला कचरा असे दृश्य शहरातील दर्शनी भागात दिसत असून स्थानिक प्रशासन याबाबत मूग गिळून नागरिकाच्या आरोग्याची खेळत असल्याचे दिसून येते.
सविस्तर वृत्त असे कि नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नगरपालिकेच्या ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड्यावर आला असून स्वच्छता अभियान अंतर्गत लाखो रुपयाच्या निधीची पारितोषिके मिळवून नामंकीत झालेली कंधार नगरपरिषद. ही कचऱ्याचे ढीगारे, उघड्यावर असलेली गटारे ठिकठिकानी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे .

शहर, गाव स्वच्छ रहावे व कचऱ्यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणुन केंद्र शासन तथा महाराष्ट्र शासन वेळोवेळी आध्यादेश जारी करत आहेत.पण कचरा व्यवस्थापकाचे नवीन नियम बनवत आहेत मात्र कंधार नगर परिषद प्रशासनाने कचराव्यवस्थापनाच्या संदर्भात तिन तेरा वाजवत असल्याचे चित्र दिसत आहे.
कंधार नगरपालिकेत सद्या प्रशासन राज चालू आहे याकडे कोण लक्ष देईल का ? स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लाखो रुपयांचा निधी येतो मग तो निधी जातो कुठे ? तालुक्यात कचराकुंड्या आहेत कुठे ? घंटागाडी कधी येथे कधी जाते जनतेचा प्रश्न ? असे विविध प्रश्न कंधार तालुक्यातील नागरीकाना पडलेला आहे.

कंधार शहरात कचऱ्याची उचल न झाल्याने शनिवारी महाराणा प्रताप चौकात कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळाले. विशेषतः कंधार तालुक्याची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप चौक येथे पकिजा हॉटेल चे बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधीमुळे आसपासचे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळच्या सुमारास कचऱ्याची उचल न झाल्याने कचरा तसाच पडून होता. सध्या सणावारांचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी येत आहेत. परंतु या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही दुर्गंधीमुळे परिणाम होत आहे.
वेळेत कचरा उचल करण्याची मागणी केली जात आहे. महाराणा प्रताप चौक येथील परिसरात कचरा च कचरा साचला होता.

कचऱ्यातील प्लास्टिक उडून आसपासच्या सीताफळ विक्रेते यांच्या डाली वर जात असल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. या कचऱ्यातूनच नागरिकांना पायी जावे लागत आहे तसेच वाहने घेऊन जावे लागत आहेत.
कचऱ्याचे ढीग पाहून परगावावरून आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वेळेत कचरा उचलावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

 

कंधार तालुक्यातील महाराणा प्रताप चौक जवळील पकिजा हॉटेल चे बाजूला असलेल्या रस्त्यावर शनिवारी कचऱ्याचे ढिगारे आढळून आले त्यामुळे वाहनचालकासाठी व पायी चालण्यासाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावरील कचऱ्यामुळे भटक्या गुरांचा आणी कुत्र्याचा संचार वाढला आहे. कचऱ्यामुळे जवळील लोकांना रोगराई पसरण्याची भीती असून नगर पालिकेने रस्त्याच्या बाजूला पडून असलेला कचरा उचलण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *