कंधार शहरात प्रथमच लेदर बॉलचे क्रिकेट सामने

 

 

कंधार  ; संतोष कांबळे

दिवाळी सुट्ट्या निमित्त कंधार शहरात प्रथमच ” जगतुंग लेदर बॉल चषक २०२४” सामन्यांचे निमंत्रित सामने आयोजित करण्यात आले आहेत. तरी कंधार तालुक्यातील तमाम क्रिकेट प्रेमींनी याचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रो अंड ग्लो क्रिकेट क्लब कंधार च्या वतीने करण्यात आले आहे.

कंधार येथील कै. दीपक आव्हाळे मैदानावर ( शिवाजी शाळेच्या पाठीमागे ) सदरील सामन्यांचे आयोजन दिनांक 27.10.2024 पासून करण्यात आले आहे.तरी या लेदर बॉल क्रिकेट सामन्यांमध्ये प्रथम पारितोषिक वैष्णवी अडवर्टायझिंग एजन्सी कंधार तर्फे 31 हजार रुपये व द्वितीय पारितोषिक 21 हजार रुपये मुंडे करिअर अकॅडमी कंधार च्या वतीने ठेवण्यात आलेले आहे. आयोजित लेदर बॉल क्रिकेट चे सामने खेळण्यासाठी नांदेड, जिंतूर, वसमत, देगलूर व कंधार येथून संघ सामील होणार आहेत.

तरी या या निमंत्रित लेदर बॉल चषका साठी तमाम कंधार तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी आनंद लुटण्यासाठी व खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहान पत्रकार सत्यनारायण मानसपुरे,शंतनु कैलासे सर व कंधार क्रिकेट टीमचे कॅप्टन विजय राठोड, डॉ. वैभव केंद्रे, डॉ. विवेक केंद्रे, डॉ.विवेक कल्याणकस्तुरे, नितीन जोंधळे सर, शादुल शेख, कौतुक जोहरे, ऋषिकेश ठेवरे, बंटी पवार, आदित्य गुरुपवार, इम्तियाज शेख, प्रशांत घाटे, जफर चौउस, निखिल दिलेराव, देविदास राठोड, तनवीर ,शाहिद, ऋतिक या सर्व कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *