*कंधार प्रतिनिधी- संतोष कांबळे*
मुखेड तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य तथा पत्रकार अजित पवार यांनी बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरुन चार जणांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करावी व सदरील घटनेचा निषेध व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने तहसील कार्यालय आणि पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप यांना निवेदन देऊन करण्यात आले.
पत्रकार अजित पवार हे मंगळवार, दि.२२ रोजी संध्याकाळी ७:३० दरम्यान मुखेड बा-हाळी रोडवर जात असताना खानापुर फाट्याजवळ पत्रकार पवार यांची मोटारसायकल अडवून आरोपी नदीम पाशा तांबोळी, गंगाधर गोरशेटवाड व इतर दोन अनोळखी इसमांनी मारहाण केली. व अश्लिल भाषेत शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याघटनेची व्हॉईस ऑफ मिडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे व जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलिस प्रशासनास संपर्क करुन सदरील घटनेच्या विरोधात भारतीय न्याय संहिंताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित आरोपीवर गुक्रामाबाद पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा र.नं.२२७/२४ विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाने पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी. अन्यथा येणाऱ्या काळात व्हाईस ऑफ मिडिया शाखा कंधार तथा व नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्यावतीने तीव्र राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
पत्रकार बांधवास झालेल्या मारहाणीचा कंधार पत्रकार बांधवांनी निषेध करत दि. २३ रोजी तहसील कार्यालय कंधार यांना निवेदन देत सदरील आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी केली.
या निवेदनावर जेष्ठ पत्रकार हाफीज घडीवाला, दयानंद कदम, मुरलीधर थोटे, व्हाईस ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष सय्यद हबीब, उपाध्यक्ष मारोती चिलपिपरे, सचिव विनोद पा.तोरणे, कार्याध्यक्ष माधव गोटमवाड, सहसचिव संतोष कांबळे अँड सिद्धार्थ वाघमारे, , अँड उमर शेख, मगदूम परदेशी, जमील बेग आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.