कंधार ;
शहीद वीर संभाजी कदम यांचे नाव लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयास नाव देण्या संदर्भात माजी सैनिक संघटनेच्या वतीने अनेक दिवसापासून शासनाकडे पाठपुरावा केला जात असला तरी अद्याप पाहीजे तसे हालचाली किंवा नाव देण्या संदर्भात गती येत नसल्याने सर्वसामान्य नागरीकांनी याकडे लक्ष वेधण्याचे भावनिक आवाहन माजी सैनिक संघटनेच्या वतिने करण्यात आले.
याबाबत दि.१७ सप्टेंबर रोजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व संघटना पदाधिका-यांचे शिष्टमंडळाने
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी तथा नांदेड जिल्हाचे पालक मंञी मा.श्री आशाेकरावजी चव्हाण आणि लोहा कंधार मतादार संघाचे आमदार श्याम सुंदर शिंदे यांची नांदेड येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी बालाजी चुकलवाड , गोविंद सुर्यवंशी ,नवघरे आनंदराव,पोचिराम वाघमारे , माणिकराव देवकत्ते ,बापुराव कल्याणकर आदीची उपस्थिती होती.