कंधार ;
ऊर्ध्व मानार धरण ( लिंबोटी )आज दि १६/९/२०रोजी रात्री ९.०० वा . ९३%भरले असून पाणलोट क्षेत्रात या पुढील काळात पाऊस पडल्यास धरणाची पातळी वाढून धरणातील अतिरिक्त पाणी सांडव्या वरील गेट द्वारे मानार नदीत सोडावे लागणार आहे .लिंबोटी धरणाच्या खालील भागातील मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे .नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये,पात्रालगत चे शेती उपयोगी सामान ,जनावरे इतरत्र हलवावीत व सतर्क राहावे .असे पाटबंधारे खात्यातर्फे आव्हान करण्यात येत आहे .