उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मतदारांना देणे अनिवार्य …! प्रसार माध्यमातून तीन वेळा #जाहिरात करणे गरजेचे

 

#नांदेड , दि. 5 नोव्हेंबर :-विधानसभानिवडणूक२०२४
#लोकसभापोटनिवडणूक उमेदवारी जाहिर झाल्यापासून तर मतदान होईपर्यत जाहिर करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे अशा पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी मतदारांना माहिती होईल अशा प्रकारे माध्यमामधून एकूण तीन वेळा जाहिराती देवून जनतेला #माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

यासंदर्भात आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकामध्ये यासंदर्भातील निर्देश विस्तृतपणे प्रसिध्द केले आहे. नांदेड जिल्ह्यातील उमेदवारी जाहिर केलेल्या सर्वानी याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या काळात तीन वेळा वृत्तपत्रांतून आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातील माहिती प्रकाशित करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे करणाऱ्या राजकीय पक्षाने सुध्दा गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती संकेतस्थळ, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन तीन वेळा प्रसिद्ध करणे देखील आवश्यक आहे.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने त्यांचे पत्र क्रमांक ३/४/२०१९/SDR/खंड. IV दिनांक 16 सप्टेंबर, 2020 अन्वये निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार आयोगाने निर्दिष्ट केलेल्या कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे तीन कालावधी निश्चित केले आहेत. ज्यामुळे मतदारांना अशा उमेदवारांच्या पार्श्वभूमी बद्दल पुरेसा वेळ मिळेल.

A. नामांकन मागे घेतल्यानंतर पहिल्या ४ दिवसात. 05 ते 08 नोव्हेंबर, 2024
B. त्यानंतर पुढील 5 ते 8 दिवसांच्या दरम्यान. 09 ते 12 नोव्हेंबर, 2024
C. 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 18 नोव्हेंबर, 2024 पर्यंत

सर्वोच्च न्यायालयाच्या २०१५ च्या रिट याचिका (C) क्रमांक ७८४ (लोकप्रहारी विरुध्द युनियन ऑफ इंडिया आणि इतर) आणि २०११ च्या रिट याचिका (सिव्हिल) क्र. ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन आणि इतर विरुध्द युनियन ऑफ इंडिया व अन्य ) मधील निकालाच्या अनुषंगाने ही प्रसिध्दी आवश्यक आहे.
०००००
#विधानसभानिवडणूक२०२४
#लोकसभापोटनिवडणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *