मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास प्रतिबंध ; ३ लक्ष १ हजार ६५० मतदारासाठी ३३८ मतदान केंद्र सज्ज  – सौ .अरुणा संगेवार

कंधार (  प्रतिनिधी – माधव गोटमवाड  )

आज दि २०/११/२०२४  रोजी लोहा विधानसभा मतदारसंघात  ३ लक्ष १ हजार ६५० मतदार आपला मतदानाचा हक्क ३३८ मतदान केंद्रावर बजावणार असून सर्व मतदान केंद्र निवडणूक प्रकियेसाठी सज्ज झाले आहेत .मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाताना सोबत मतदार कार्ड न्यावे किंवा निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले बारा पुराव्या पैकी एक पुरावा मतदान केंद्राध्यक्ष यांना ओळख पटविण्यासाठी आवश्यक आहे.तेव्हा मतदारानी याची दक्षता घ्यावी असे आवाहन लोहा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सौ अरुणा संगेवार यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ लक्ष १ हजार ६५० मतदार असून त्यासाठी लोहा विधानसभा क्षेत्रात ३३८ मतदान केंद्र आहेत सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदारांनी मतदानासाठी जाताना सोबत मतदान ओळखपत्र आणावे . मतदारांनी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिलेल्या एकूण बारा पुराव्यापैकी (आधार कार्ड , पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) यासह निर्धारित केलेले कोणतेही पुरावे सादर करावे मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

  मतदारांनी शिस्तीत व निर्भयपणे मतदान करावे व  मतदानाची टक्केवारी वाढवावी.असे निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी आवाहान केले आहे.
तसेच मतदान करताना मतदान केंद्रावर कोणीही मोबाईल घेऊन जाऊ नये मतदान यंत्राचा फोटो काढू नये मोबाईल मध्ये शूटिंग करू नये जर केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही
निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार,यांनी सांगितले. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, सहायक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लालगे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *