(कंधार ; दिगांबर वाघमारे )
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे प्रभावी माध्यम आहे.नागरीकांनी आपले वैयक्तिक पातळीवरील सर्व कामे बाजूला ठेवून दि.२०नोव्हेबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपल्या हक्काचे शंभर टक्के मनदान करावे असे आवाहन कंधारचे तहसिलदार रामेश्वर मोरे यांनी व गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी कंधार येथे आयोजित रॅली प्रसंगी केले .
दि १८ नोव्हेबर रोजी स्वीप कक्षातर्फे तहसिल कार्यालय व शिक्षण विभाग कंधारच्या वतीने नामदेव महाराज सभागृह कंधार बसस्टॅण्ड ते मुख्यरस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान मतदान जनजागृती साठी बाईक रॅली चे आयोजन सकाळी करण्यात आले होते त्यावेळी तहसिलदार रामेश्वर मोरे उपस्थितांना व नागरीकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते . यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय यरमे यांनी तहसिलदार सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले दरम्यान रॅली चा समारोप मानवी साखळी तयार करून मतदानाची शपथ घेऊन करण्यात आला .
निवडणूक निर्णय अधिकारी सौ अरुणा संगेवार ,मनुष्यबळ विभाग नोडल अधिकारी चामणार,स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी संजय यरमे,कंधार तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर , केंद्र प्रमुख माधव कांबळे , प्रविण पाटील पानभोसी केंद्रप्रमुख मुंडे , एन एम वाघमारे , सदाशीव आंबटवाड ,
खाजगी शिक्षक महासंघाचे कंधार तालुकाध्यक्ष भास्कर पाटील कळकेकर , हरीहर चिवडे ,किरण बडवणे ,राजहंस शहापुरे , बसवेश्वर मंगनाळे , जे जी केंद्रे , दिगांबर वाघमारे , सुभाष मुंडे , दत्तात्रय एमेकर ,महंमद अनसारोदीन यासाठी स्वीप सदस्य श्रीमती एंगडे मॅडम,श्रीमंती आंबेकर मॅडम,श्री जंगापल्ले सर ,श्री बोळकेकर सर, व श्री गणाचार्य सर,यांच्यासह शहरातील शिक्षक शिक्षिका ,यांच्या सहभागाने कंधार शहरातून जनजागृती करण्यात आली.