इंग्रजाच्या दिडशे वर्षाच्या गुलामीतून भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला.कलम बहाद्दर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय धर्म ग्रंथ भारतीय संविधान ग्रंथाराजाची निर्मिती केली.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान ग्रंथाचा देशाने स्विकार केला.संविधानाच्या कलम ३२४ अन्वेय भारतीय निवडणुक आयोगाची स्थापना दि.२५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली.देशात लोकशाही संसदेची पहिली निवडणुक १९५१ या वर्षी झाली, आणि १७ एप्रिल १९५२ रोजी स्वातंत्र झालेल्या भारत देशातले पहिले शासन कार्यान्वित झाले.पण आमच्या मराठवाड्यातील ऐतिहासिक कंधार तालुका हा हैद्राबादी निजामाच्या गुलामीतून मरण यातना भोगत होता.भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १ वर्ष १ महिना दोन दिवसांनी म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी तत्कालीन स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी लष्करी कारवाई करून पोलिस अॅक्शन सलग चार दिवस चालले अन् १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैनिकांनी मोहिम फत्ते करत शेवटचा निजाम मीर उस्मान यांना शरणगती
पत्करावी लागली.त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला भारतीय धर्म ग्रंथ संविधान अंगीकृत करुन २६ जानेवारी १९५० पासुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास आरंभ झाला. भारतीय संविधान ग्रंथावर आधारीत लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीस सुरुवात झाली.कंधार हा विधानसभेचा मतदारसंघ हैद्राबाद विधानसभेशी सलग्न होता.पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वातंत्र्य सैनिकांचा बोलबाला होता.त्यामुळेच भा.रा.काँ. पक्षा तर्फे स्वातंत्र्य सेनानी मा.गोविंदराव मोरे (देसाई) टेळकीकर विरोधात भा.शे.का.पक्षाचे श्यामराव कदम यांच्यात लढत झाली.त्यात पहिले आमदार म्हणुन गोविंदराव मोरे टेळकीकर(देसाई) यांना विजयश्री मिळाली.त्यानंतर मुंबई म्हणजेच तेंव्हाच्या बॉम्बे प्रांतात राज्य पुनर्रचनेनंतर १९५६ मध्ये कच्छ आणि सौराष्ट्र, मध्य प्रांतातील नागपूर, हैदराबादमधील मराठवाडा हा भाग जोडण्यात आला होता. यामुळेच १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघ त्रिसदस्यीय तर काही द्विसदस्यीय मतदारसंघ होते. मराठी भाषिक स्वतंत्र राज्यासाठी तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती.या चळवळीचे पडसाद १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत उमटले. मुंबई प्रांताच्या पहिल्या निवडणुकीत कंधार विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे प्राबल्य होते. पण दुसऱ्या म्हणजे १९५७ च्या कंधार विधानसभेच्या दुसऱ्या निडणुकीत स्वातंत्र्य सेनानी,नुकतेच बी.ए.ची पदवी मिळविलेला, अन् राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आशीर्वाद मिळवलेला एक पुरोगामी क्रांति विचाराचा तरुण भा.शे.का.पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच भाई केशवराव धोंडगे यांना उमेदवारी मिळाली.त्यांच्या विरुध्द माजी आमदार गोविंदराव मोरे टेळकीकर(देसाई)यांचे थोरले बंधु आनंदराव नरसिंहराव देशमुख देसाई यांचेशी लढत होऊन पहिल्यांदाच कंधार विधानसभा निवडणुकीत भाई केशवराव धोंडगे यांनी विजय मिळवला.त्यांनी विधानसभेत आपल्या ओजस्वी आणि निर्भीड कामाचा सपाटा लावला.मतदार संघ म्हणजे त्यांचे कुटुंब होते.१९५९ हे वर्ष त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सुवर्ण वर्ष म्हणुन गणल्या जाते.त्यानंतर १९६२ ची कंधार विधानसभेची सार्वत्रिक तिसरी निवडणुकीची अधीसुचना निघाली.क्राॅग्रेस पक्ष आपले डावपेच आखण्यास सुरुवात झाली.पण भा.शे.का. पक्षाचे भाई केशवराव शंकरराव धोंडगे यांची प्रतिमा मतदार राजांच्या ह्रदयसिंहासनावर आरुढ होती.म्हणून विधानसभेच्या निवडणुकीस सामोरे जातांना भाई केशवराव यांच्याकडे भाई गुरुनाथराव कुरुडे,भाई राजेश्वरराव आंबटवाड, भाई बापूराव वाडीकर,भाई झोटींगराव पाटील यांचे सहित अनेक विश्वासू तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी होती.त्यांच्या विरोधात हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात कार्य करणारे स्वातंत्र्य सैनिक साहेबराव सखोजीराव बारडकर देशमुख (बापू) यांनी भा.काँ. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास सज्ज होते.१९६२ च्या निवडणुकीत विजय मिळवून दुसऱ्यांदा आपल्या मतदार राजांची सेवा करण्यास भाई केशवराव नवस्फूर्तीने कामाला लागले.त्यानंतरच्या झालेल्या १९६७ च्या निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने आपल्या कार्यकर्ते व मतदार राजांच्या हिंमतीवर तिसऱ्यांदा व कंधार मतदार संघातील विधानसभेच्या चौथ्या निवडणुकीत दंड थोपटून (शे.का.पक्षाच्या) वतीने भाई केशवराव धोंडगे तयारीला लागले.पुन्हा पारंपारिक विरोधातला पक्ष म्हणजे (भा.रा.काँ.पक्षाकडून) साहेबराव सखोजीराव बारडकर देशमुख (देशमुख)उभे करण्याचे जाहिर झाले.पण याही खेपेला भाई केशवराव धोंडगे यांच्या गळ्यात विजयाची माळ तिसऱ्यांदा गळ्यात पडली.
१९७२ च्या दुष्काळी परिस्थिती असतांना महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणुक आली.या वेळेस (भारतीय शेतकरी कामगार पक्ष) तर्फे चौथ्यांदा भाई केशवराव धोंडगे हे आपल्या यशस्वी आमदारकीची घोडदौड सुरुच ठेवली.या वेळेस (भा.रा.क्राॅ.) पक्षाच्या वतीने नागोराव जाधव यांचे धाकटे बंधू प्रा.विठ्ठलराव माधवराव जाधव यांनी बलाढ्या भाई केशवराव धोंडगे यांच्या विरुध्द दंड थोपटले.पण केशवराव धोंडगे यांचे कार्य समाजहिताचे असल्यामुळेच कठीण दुष्काळाच्या कालखंडातही भाई धोंडगे हे चौथ्यांदा अन् कंधार विधानसभेचे पाचवे आमदार झाले.
१९७२ ला एकुण ०३ उमेदवार केशवराव शंकरराव धोंडगे (शे.का.पक्ष) विजयी उमेदवार,मिळालेले मतदान-३४४२१,प्रा.माधवराव विठ्ठलराव जाधव (भा.रा.काँ.पक्ष) दुसऱ्या क्रमांकावर मिळालेले मतदान-२१८६६ ,पुंडगे एम.जी.(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया)मतदान-२७५८ एकुण झालेले मतदान ५९०४५.
१९७२ चा कार्यकाळ संपण्याच्या आत देशात तत्कालीन पंतप्रधान याह्यासूरमर्दिनी श्रीमती इंदिराजी गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी संपूर्ण देशात आणीबाणीची घोषणा करुन हुकूमशाही जवळपास २१ महिने चालवली.देशातील अनेक मातब्बर नेत्यांना हुकूमशाहीच्या जोरावर तुरुंगात डांबले.देशातील आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई केशवराव धोंडगे यांना नांदेड लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यसभेचे खासदार प्राचार्य गो.रा.म्हैसेकर यांना पराभूत करत,”धोंडगेचा गाडा,दिल्लीला धाडा!”मतदारांनी भाई केशवराव धोंडगे॔चा भारताची राजधानी दिल्लीच्या संसदेत गाजण्याठीच महाराष्ट्र राज्यात मताधिक्याने व्दितीय क्रमांकाची मते घेऊन भारतीय संसदेत खासदार म्हणून निवडून गेले.
१९७८ ला एकुण ०६ उमेदवार गुरुनाथराव माणिकराव कुरुडे (शे.का.पक्ष) १०४०३ मतांनी विजयी उमेदवार,मिळालेले मतदान-२९८२५ ,ईश्वरराव नारायणराव भोसीकर (भा.रा.काँ.पक्ष) दुसऱ्या क्रमांकावर मिळालेले मतदान-१९४२२, गणपतराव भाऊराव मोरे (अपक्ष) मतदान-८७९९,बाबुराव हिरामणराव पुलकुंडवार (अपक्ष) मतदान-६२५५, मोतीराम विठोबा सोनकांंबळे (अपक्ष) मतदान-२५३२,रंगनाथ रामराव भुजबळ (अपक्ष) मतदान-१६१० एकुण झालेले मतदान-६८४४३.
१९८० ला ०५ उमेदवार ईश्वरराव नारायणराव भोसीकर (भा.रा.काँ.पक्ष) फक्त ५५ मतांनी निसटता विजय, विजयी उमेदवार मिळालेले मताधिक्य-२९४२६,गुरुनाथराव माणिकराव कुरुडे (शे.का.पक्ष) व्दितीय क्रमांकाचे मताधिक्य-२९३७१,बाबुराव हिरामणराव पुलकुंडवार (अपक्ष) मतदान-३६०२,नारायणराव रामराव पवार ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया )मतदान-२४८०,अनंतराव किशनराव मामडे (अपक्ष) मतदान-४७९.एकुण झालेले मतदान-६५३५८.
१९८५ ला ०३ उमेदवार केशवराव शंकरराव धोंडगे (शे.का.पक्ष) मिळालेले मताधिक्य-५०४६१ इतके मिळाले.२८७२९ मतांनी विजयी.व्दितीय क्रमांकावर ईश्वरराव नारायणराव भोसीकर (भा.रा.काँ.पक्ष) यांना ३०७३२ मतदान घेतले,शिवाजी माधवराव नळगे (अपक्ष) यांना ११८४ मतदान मिळाले.एकुण झालेले मतदान-८२३७७.
१०९० ला २० उमेदवार रिंगणात केशवराव शंकरराव धोंडगे (शे.का.पक्ष) यांचा ८३८० मताधिक्याने विजय मिळालेले मतदान-३०१९५,रोहिदास खोब्राजी चव्हाण (शिवसेना पक्ष) मिळालेले मतदान-२१८१५ मते घेऊन व्दितीय क्रमांकावर,व्यंकटराव देवराव मुकदम (भा.रा.काँ.पक्ष) १९५० इतके मतदान मिळाले.नागनाथ शंकरराव गीते (अपक्ष) १७६८९ मते, शिवराज थोराजीराव वडजे (अपक्ष) ६३६० मते,सुधाकर मरीबा कांबळे (अपक्ष) ३६५८ मते,पांडूरंग महादू गलपवाड (बी.एस.पी.) १२७१ मते,विलास आबाजी पवार (अपक्ष) ९१२ मते,सिंधुताई शंकरराव टाले (अपक्ष) ८७५ मते,शिवराज ग्यानोबा भोसीकर (अपक्ष) ६६८ मते,अनंत किशनराव मामडे (अपक्ष) यांना ४२२ मते,उषादेवी हरिसिंह ठाकुर (अपक्ष) २९३ मते,बळीराम कोंडीबाराव वाघमारे (अपक्ष) २६६ मते,शेख अल्लाउद्दीन मुनवरसाब (अपक्ष) २१५ मते,दत्ता खंडू कांबळे (अपक्ष) १८१ मते,बालासाहेब गणपतराव मोरे ( दुरदर्शी पार्टी) १७२ मते,सुभाषचंद्र बापूसाहेब नाईक (अपक्ष) १४० मते,हरि ग्यानोबा सूर्यवंशी (अपक्ष) ११५ मते,किशन नागोबा कुंभाळे (अपक्ष) ८९ मते,हरिश्चंद्र गोपीचंद पवार (अपक्ष) ६२ मते एकुण मतदान १०५३३८ झाले.
१९९५ ला १२ उमेदवार रिंगणात रोहिदास खोब्राजी चव्हाण (शिवसेना पक्ष) यांनी ४८७०२ एवढे मताधिक्य घेऊन १७०५४ मतांने विजयी झाले.शंकरराव गणेशराव धोंडगे (अपक्ष) ३१६४८ मते घेऊन व्दितीय क्रमांकावर राहिले.माधवराव गोविंदराव पांडागळे (भा.रा.काँग्रेस पक्ष)१९४२० मते,केशवराव शंकरराव धोंडगे (शे.का.पक्ष) १६९९४ मते,बाबुराव भगवानराव केंद्रे (भारीप बहूजन महासंघ) ७२०८ मते,डाॅ.रामराव तुकाराम (अपक्ष) ४४०४ मते,रामदास दिगंबरराव यन्नावार (अपक्ष) ९१२ मते,डाॅ.गुलाम जीलानी गुलाम महेबूब (अपक्ष)५७५ त्र्यंबक गोविंदराव जोंधळे (अपक्ष) ५२७ मते,प्रकाश संभाजी गारोळे (अपक्ष)३५४ मते,शेख दस्तगीर शेख नबीसाब (अपक्ष) ३१८ मते,संतोष रामकिशन चावडा (दुरदर्शी पार्टी) १७३ मते,एकुण १३१७६५ मतदान झाले.
१९९९ ला १० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात रोहिदास खोब्राजी चव्हाण (शिवसेना पक्ष) यांनी ३९६६२ मतदान घेऊन ७७९७ मताधिक्याने विजयी झाले.ईश्वरराव नारायणराव भोसीकर (रा.काँग्रेस पक्ष)३१८६५ मतदान घेत व्दितीय क्रमांकावर होते.शंकरराव गणेशराव धोंडगे (स्वतंत्र भारत पक्ष)२५५०७ मते,केशवराव शंकरराव धोंडगे (शे.का.पक्ष)१७८९४ मते,देविदास चंदर राठोड (एन.एम.पी ) १५५४ रुपकुमार नारायणराव कांबळे (अपक्ष)८३८,नामदेव रामा गायकवाड (अपक्ष)६५६,शिवलिंग संभाजी दुलेवाड (बी.एस.पी.)६२४,डाॅ.दिनकर जायभाये (अपक्ष)३०६ ,रुक्मीणबाई शंकरराव गीते (अपक्ष)२०५ ,एकुण ११९७६४ मतदान झाले होते.
२००४ ला रिंगणात उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर (अपक्ष) ४९१९१ मते घेत ५९७३ मताधिक्याने विजयी झाले.शंकरराव गणेशराव धोंडगे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ) यांनी ४३२१८ मते घेऊन व्दितीय क्रमांकावर राहिले.रोहिदास खोब्राजी चव्हाण (शिवसेना पक्ष)४२५११,हरिहर विश्वनाथराव भोसीकर (अपक्ष)१२६६६,विक्रम विठ्ठलराव सोरगे (बहूजन समाज पक्ष)२४८४,प्रभू संभाजी लूटे (अपक्ष)२१९०,व्यंकटराव किशनराव बोराळे (अपक्ष)१७९३,संतुकराव बाबुराव केंद्रे(अखिल भारतीय सेना)१३९३,गोवर्धन जनार्दन दिपोंडे राष्ट्रीय समाज ८६९,शिवलिंग संभाजी दुलेवाड (अपक्ष) एकुण १५९४२३ मतदान झाले.
२००९ ला १२ उमेदवार रिंगणात शंकरराव गणेशराव धोंडगे(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)८१५३९ घेऊन ९३६४ मताधिक्याने विजयी झाले.प्रताप पाटील चिखलीकर (लोकभारती पक्ष)७२१७५ मते,प्रा मनोहर बाबाराव धोंडे (शिवसेना पक्ष)७०८७,शहाजी संभाजीराव उमरेकर (अपक्ष)१९९९,रुपकुमार नारायणराव कांबळे(अपक्ष)१८०७,शिवकुमार नारायणराव नरंगले (मनसे)१७६५,नरेंद्र बाबाराव गायकवाड (बसपा)१६९६,बोरोळे व्यंकटराव किशनराव (अपक्ष)१५०७,सुमित रामराव राठोड(अपक्ष)१३९६,बालाजी गोविंदराव आदमपूरे (अपक्ष)११०६,विठ्ठल पुंडा हंबीलकर (बा.भ म.)४५२,आनंदा पांडूरंग नवघरे (राष्ट्रीय क्रांतिकारी समजवादी पार्टी)३४८ एकुण १७२८४७ मतदान झाले होते.
२०१४ ला १६ उमेदवार रिंगणात प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना पक्ष )९२४३५मते घेऊन ४५४८६ मताधिक्याने विजयी झाले.मुक्तेश्वर केशवराव धोंडगे (भाजपा) यांना ४६९४९ मते घेऊन व्दितीय क्रमांकावर, शंकरराव गणेशराव धोंडगे-२९२९४,रोहिदास खोब्राजी चव्हाण (मनसे)६५६८,डाॅ.श्यामराव बापूराव तेलंग (रा.काँग्रेस पक्ष)५३१२,प्रा.मनोहर बाबाराव धोंडे ४८७८,श्वेता अर्जुनराव कांबळे (बी एस.पी.)३४८८,नोटा-२२९५,अविनाश विश्वनाथराव भोसीकर (जन सुराज्य शक्ती)१३२०,अँड ए.एस.वाघमारे बाचोटीकर (अपक्ष)५४९,बोरोळे व्यंकटराव किशनराव (अपक्ष)५४९,शिवराज वाघमारे (अपक्ष)५१५,ज्ञानेश्वर शिंदे हरबळकर (अपक्ष)४६७,पठाण महेमुद हैदर (जे.डी एस.)४५९,भारत बापूराव कोपनर (अपक्ष)४५३,राजरत्न भीमराव गायकवाड (रिपब्लिकन बहूजन सेना)४१५,पांडूरंग तोलबा वन्ने (अपक्ष)३०६,एकुण मतदान १९६८०० झाले होते.
२०१९ ला १० उमेदवार रिंगणात श्यामसुंदर दगडोजी शिंदे (शे.का.पक्ष)१९१६६८ मते घेऊन ६४३६२ मताधिक्याने विजयी झाले.शिवकुमार नारायणराव नरंगले (वंचित बहूजन आघाडी)३७३०९ मते घेऊन व्दितीय क्रमांकावर राहिले.मुक्तेश्वर केशवराव धोंडगे (शिवसेना पक्ष)३०९६५,दिलीप शंकरराव धोंडगे (एन.सी पी.)१४५१७,सुभाष भगवान कोल्हे (एस.बी पी.)२५५९,पांडूरंग तोलबा वन्ने(अपक्ष)१७९०,नोटा-१२४९,हणमंत रघुनाथ वाडेवाले
(बी.एस.पी)१११८,भारत बाबाराव कोपनर(अपक्ष)६३४,रुक्मीणबाई शंकरराव गीते (जे.डी.एस. )५१८,रघुनाथ बाबुराव गजले (अपक्ष)४६१,एकुण १९२६९२ मतदान झाले.
सध्या लोहा-कंधार विधानसभेची सार्वत्रिक निवडणुक जाहीर होऊन प्रचार शिगेला पोहंचला आहे.
२०२४ च्या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत.
नामनिर्देशित उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप राज्याचे नावः- महाराष्ट्र विधानसभा मतदार संघाचे नाव:- 88-लोहा विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षाने उमेदवाराना उभे केले आहे. त्या राजकीय पक्षाचे नाव (राष्ट्रीय/ राज्य किया नोंदणीकृत) किंवा अपक्ष
एकनाथ रावसाहेब पवार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मशाल २) चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)३)आशाबाई श्यामसुंदर शिदे
(पिशंट्स अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडीया) शिट्टी ४) चंद्रसेन ईश्वर पाटील(जनहित लोकशाही पार्टी)बॅट ५)
शिवकुमार नारायणराव नरंगले(वंचित बहुजन आघाडी) गॅस सिलेंडर ६) सुभाष भगवान कोल्हे (संभाजी ब्रिगेड पार्टी) शिवण यंत्र ७)आशा श्यामसुंदर शिदे(अपक्ष) ट्रक
८) एकनाथ जयराम पवार(अपक्ष)चिमणी ९)
पंडीत सुदाम वाघमारे(अपक्ष) कपाट१०)प्रकाश दिगंबर भगनुरे(अपक्ष)सफरचंद११)बालाजी रामप्रसाद चुकलवाड(अपक्ष)अंगठी१२)प्रा. मनोहर बाबाराव धोंडे (जन सुराज पक्ष/अपक्ष)प्रेशर कुकर१३)सुरेश प्रकाशराव मोरे(अपक्ष)ऑटो रिक्शा१४)संभाजी गोविंद पवळे (अपक्ष)फुगा वरील उमेदवार आपले भाग्य पणाला लावून एकमेकाविरुध्द लढत आहेत.बघुया या निवडणुकीत यशाची विजयी माला कुणाच्या गळ्यात पडून महाराष्ट्र विधानसभेत लोहा-कंधार मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे?आज पर्यत १५ आमदार महोदयांनी लोकप्रतिनित्व केले.त्यांत सर्वात जास्त कार्यकाळ प्रतिनिधित्व करणारे डाॅ.भाई केशवराव शंकरराव धोंडगे यांनी ०६ टर्म,रोहिदास खोब्राजी चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर हे प्रत्येकी ०२ टर्म,गोविंदराव मोरे देसाई टेळकीकर, गुरुनाथराव माणिकराव कुरुडे, ईश्वरराव नारायणराव भोसीकर, शंकरराव गणेशराव धोंडगे, श्यामसुंदर दगडोजी शिंदे यांनी ०१ टर्म आता पर्यंत १५ लोकप्रतिनित्व आमदार म्हणुन केले आहे.यंदा पाहूया कोण निवडणुकीत बाजी मारून मुंबई महाराष्ट्र विधानसभेत लोहा-कंधारचे आमदार म्हणुन लोकप्रतिनित्व करणार याची जनता-जनार्धनास लागली आहे.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार