लोहा विधानसभा निवडणुकीत माझा कोणालाच पाठींबा नाही – शंकर अण्णा धोंडगे

 

अफवेला बळी पडू नका ..! पत्रकार परिषदेत आवाहन

कंधार ; प्रतिनिधी

गेल्या पस्तीस वर्षानंतर प्रथमताच मी निवडणूक प्रकियेतून माघार घेतली आहे . याचा फायदा घेवून मतदार संघात कार्यकर्ते व मतदारांना संभ्रम निर्माण करण्याचे काम काही मंडळीकडून केले जात आहे . माझा कोणत्याच आघाडीला व पक्षाला पाठींबा नसून कार्यकर्ताने सदसद्विवेकबुद्धी जाग्रत ठेवून मतदान करावे व उफवांना बळी पडू नका असे आवाहन आज दि १५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य समितीचे MRS पक्षप्रमुख शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी शंकर‌ अण्णा भवन भवानीनगर कंधार येथे आयोजीत पत्रकार परिषदेत केले .

तसेच आगामी येणाऱ्या सर्व निवडणीसाठी आपली सर्व प्रतिष्ठा सांभाळून मनदान करावे 35 वर्षा पासून आदेश पाळलात परंतू यावर्षी मात्र कोणालाही पाठींबा नाही माझी भुमिका स्पष्ट केली सर्व आपआपली सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करावे . असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत केले
यावेळी दत्ता पाटील,शिवराज पाटील धोंडगे,दिलीप दादा धोंडगे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *