*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*
अनोळखी मोबाईल क्रमांकावरून राजकीय पक्षांचा प्रचार मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी जाहिरातींच्या फोन कॉलमुळे अगोदरच सर्वजण वैतागले असताना, आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पक्ष मोबाईलवर जाहिराती करून मतदाराला वेठीस धरत आहेत. फोनद्वारे राजकीय जाहिरातीतून मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असून, मात्र अचानक येणाऱ्या अनोळखी फोन वरील राजकीय जाहिरातींमुळे सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. महाराष्ट्रात (२० नोव्हेंबर रोजी) विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मतदाराला आपलंसं करण्याच्या दृष्टीने सर्वच स्तरातून प्रयत्न केला जातो आहे. आपल्या पक्षाचे काम किती चांगले आहे हे सांगण्यासाठी पक्षाचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या मोठ्या सभा देखील पार पडत आहेत. सोबतच सोशल मीडियाचा वापर करून राजकीय जाहिरातींच्या माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत आपल्याच पक्षाला मतदान करण्यासाठी गरळ ओकली जात आहे. मात्र मोबाईल फोनवर राजकीय जाहिरातीची स्पर्धा आता सर्वत्रच बघायला मिळते आहे.
वर्तमान आत्ताच्या तरुण पिढीला सोशल मीडियाच महत्त्व समजत असले तरी, ज्येष्ठ व्यक्ती अथवा दुर्गम आदिवासी तथा वाडी तांड्यावरील भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांकडे कॉलिंग करण्यासाठीचा मोबाईल असतो. शहर ग्रामीण भागात मोबाईलवर फोन आलाच, तर पटकन उचलला जातो. त्यामुळे मोबाईल कॉलवर राजकीय जाहिराती केंद्रित केल्या आहेत. मोबाईलवर येणारा कॉल महत्वाचा मानून प्रत्येकजण उचलत असतो. मात्र राजकीय जाहिरातींच्या कॉलमुळे सर्वजण मेटाकुटीला आले आहेत.
मोबाईलवर अनोळखी नंबरचा कॉल आला तरी अनेक जण उचलतात. खूप बिझी असल्यास कट करून थोडा वेळाने या क्रमांकावर फोन करतात. मात्र राजकीय पक्षाची कॅसेट या कॉल सुरू आहेत. आमचा पक्ष किती चांगला काम करतो आहे असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न राजकीय पक्ष करताना दिसतात. अशा अनोळखी मोबाईल क्रमांकावर फोन करायचा झाल्यास हा फोन अस्तित्वात नाही असे सांगितले जाते.
एकंदरीत राजकीय जाहिरातींच्या फोन कॉलमुळे मतदारांची डोकेदुखी! प्रचंड प्रमाणात वाढली आहे . असे लोहा कंधार मतदारसंघ चित्र दिसून येत असून सामान्य मतदार जनता वैतागून गेले आहेत .