बारुळ येथिल मानार धरणाच्या लगत वाढलेले वृक्ष ,झुडपे पालव्या तात्काळ तोडण्यात याव्या सहाय्यक अभियंता शिराढोणकर यांना निवेदन

कंधार ;

कंधार तालुक्यातील बारुळ येथिल मानार धरणाच्या लगत वाढलेले वृक्ष पालव्या मोठ्या प्रमाणात वाढले असून भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो म्हणून तात्काळ या पालव्या व झुडपे तोडण्यात याव्या असे
निवेदन दि.१८ सप्टेंबर रोजी शिराढोणकर साहेब सहाय्यक अभियंता मानार धरण यांना देण्यात आली.

सदरील निवेदन बारुळ येथिल तरुण कार्यक्रते ओम ठाकुर यांच्या वतीने देण्यात आले असून नेहमीच बारुळ व बारुळ परीसरातील नागरिक ,सर्व सामान्य शेतकरी यांच्या प्रश्नासाठी नेहमीच अग्रेसर असतात .आपल्या वेगवेगळ्या मागण्या व अंदोलनातून ओम ठाकूर यांनी आपली समाजसेवा कृरण्याची वृती दाखवली आहे.दि.१८ सप्टेंबर रोजी शिराढोणकर साहेब सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यायात आले यावेळी वेळी आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांचे प्रवक्ता तथा प्रसिद्धिप्रमुख योगेश पाटील नंदनवनकर ,ओम ठाकूर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *