हुबेहूब पोतराज मनोज वाघमारे अन् वासुदेव कलावंताची भुमिका बुध्दभुषण ढवळेंनी साकारली.

 

 

यंदाच्या ३० व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलन गुराखीगड ता.लोहा,जि.नांदेड या जागतिक संमेलनाच्या शोभायात्रेत मरीआईचा पोतराज,कृष्णभक्त वासुदेव, वाघ्या-मुरळी, वैदू भगीनी,गडचांद्याची देवकरीण अशा लोककला कलावंताची भूमिका हरहुन्नरी कलावंताच्या सृजनशीलतेतून साकारणारे विद्यार्थी मरीआईचा पोतराजाच्या भूमीकेत मनोज विद्यासागर वाघमारे वर्ग ८ वा सेमी अ,कृष्णभक्त वासूदेव कलावंत बुध्दभुषण ढवळे घोडजकर वर्ग १० ब, वर्ग ९ वी तील विद्यार्थीनी देवकरीण,वाघ्या-मुरळी, वैदीण अशा भुमिका शोभायात्रेत आणि गुराखीगडावर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व आमदार विद्रोही विचारवंत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांची प्रतिमा विशालकाय रांगोळीत बाल रांगोळीकार रमाकांत भीमरावजी जोंधळे,अशोक नगर(कोटबाजार)ता.कंधार यांनी साकारल्याने श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या शाळेचे प्रतिनिधित्व करते वेळी शाळेला पहिलाच क्रमांक मिळाला.सोबत सिध्दहस्त साहित्यिकश्री डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचे तैलचित्र अन् त्यांनी लिहिलेले ३८ उत्कृष्ट ग्रंथांसंग डाॅ.भाई मुक्ताईसुतानी लिहिलेल्या मायपाठाचे अखंड गायन संगीत शिक्षिका विमलबई वडजे आणि मृदंग विशारद तबला वादक गोविंदराव अनकाडे व श्री शिवाजी हायस्कूल गानकोकिळा आठव्या अ वर्गातील विद्यार्थींनी पायल पांचाळ नागलगांवकर हीने केले. या ग्रंथ दि॔डीने सर्वांचे लक्ष वेधले होते.हे ज्ञानालय शोभायात्रेत प्रथम आल्याची घोषणा खुद्द श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब यांनी घोषित करुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.दि २७ जानेवारीस गुराखीगडावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच शिक्षिकांचे अभिनंदन! मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व स्टाफचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.विद्याताई फड मॅडम यांनी उत्कृष्ट केले.या विद्यार्थी कलावंताचा सन्मान १ फेब्रुवारी २०२५ रोजी स्नेहसंमेलनात मातोश्री मुक्ताई सांस्कृतिक कलामंडपात शाळेच्या वतीन मान्यवरांच्या करकमलांनी करण्यात येणार आहे.सर्व कलावंत विद्यार्थ्याच्या कलेस मानाचा मुजरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *