आज बालगंधर्व रंगमंदिरात पुणे लावणी महोत्सव होता.. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पा झांबरे हे माझे मित्र आणि उत्तम माणूस.. आदर कसा करावा , मान कसा द्यावा हे त्यांच्याकडून शिकावं.. दरवर्षी घरी येउन पत्रिका देणार आणि आवर्जून दिपप्रज्वलनासाठी मला बोलावणार आणि तिथे गेल्यावर त्यांच्याकडून प्रचंड आदर दिला जातो.. आजही तो मिळाला .. थोडा वेळ लावणीचा आनंद घेतला .. आपल्या महाराष्ट्रातील शान लावणी आणि कलाकाराच्या अदानी मन संतुष्ट झालं.. आप्पा हा आनंद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद..
चंद्रपूरहुन एक व्यक्ती आली होती त्यांना मला भेटायचे होते कारण होतं ते तृतीयपंथी यांच्यावर पीएचडी करत आहेत
त्याना भेटायला रंगमंदिराच्या बाहेर आले तर तीन व्यक्तीनी मला हाक मारली आणि म्हणाले , मी तुमचा वाचक आहे , फॉलोवर आहे.. बियॉन्ड सेक्स वाचली आहे आणि रोजचे लिखाण वाचतो.. फेसबुकवर तुम्हाला फॉलो करतो आणि तुमच्या सगळ्या पोस्ट पहातो.. माफ करा मी त्यांचं नाव विसरले.. हे वाचून त्यांनी आवर्जून मेसेज करावा..
ते एक वाक्य बोलले आणि मी मनात फक्त हरेकृष्ण म्हटलं ते वाक्य असं होतं
” मॅडम चार दिवस तुमच्यासोबत राहून तुमची सेवा करायला मिळावी अशी इच्छा आहे.. अगदी तुमचे कुठलही काम करायला आवडेल.. अगदी ड्रायव्हरचही काम चालेल…”
ते शेतकरी आहेत आणि त्यांच्या बोलण्यात माझ्याबद्दल प्रचंड आदर होता.. त्या त्यांच्या वाक्यावर मी इतकच म्हणाले , सेवा करायची तर भगवंताची करा.. मी तुमच्यासारखीच सर्वसामान्य व्यक्ती आहे.. आणि हेच खरं आहे… त्यांनी फोटो घेतला आणि ते निघून गेले..
त्यानंतर त्यांच्या मागे अजून एक वाचक मला भेटायला थांबले होते ते साताऱ्याहुन आले होते.. त्यानंतर एक पत्रकार होते जे वाचक होते.. ते म्हणाले , आम्हाला रोज इतकं फुकट ज्ञान देता त्यामुळे तुम्हाला साडी गिफ्ट द्यायची आहे .. घ्याल का तुम्ही ??..मला काय बोलावं काहीही कळेना.. मी त्यांना नाही म्हटलं तर म्हणाले तुमच्यामुळे मी मांसाहार सोडलं आणि रोज जप करतो . ऐकून खूपच आनंद झाला.मनात म्हटलं , भगवंता खरच रे तु ग्रेट आहेस.. लैगिकता आणि अध्यात्म याची सांगड घालून तु माझ्याकडून लिहुन घेतोस आणि माझे वाचक ते फक्त वाचत नाहीत तर फॉलो करतात.. मी कायम म्हणते आणि आताही म्हणेन एकतर तोच माझ्याकडून लिहून घेतो आणि त्याची पोचपावती द्यायला तोच वाचकांना म्हणजे देवाना माझ्याकडे पाठवतो..
जेव्हा मी ॲक्टींग करायची तेव्हाही असच प्रेम मिळायचं आणि आताही लेखिका म्हणुन काम करताना त्यावेळी ते प्रेक्षक होते ते आता वाचक होवून माझ्याभोवती रुंजी घालत आहेत आणि या सगळ्याचं क्रेडीट माझा कृष्ण आणि माझे वाचक , फॉलोवर आणि मित्र यांना जातं.. यातलं कुठलही क्रेडीट मी माझ्याकडे घेणार नाही कारण तितकी योग्यताच नाही.. तुमचे प्रेम हीच माझ्या लिखाणासाठी ऊर्जा आहे.. सतत म्हणत रहा..
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे..
फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत रहा.. योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला आपला मानसन्मान मिळत रहातो कारण आपल्या प्रत्येक कृतीवर त्याचं बारीक लक्ष असतं..
माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.. धन्यवाद आणि आभार..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist