मराठी पत्रकार परिषद मुंबई, व परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व सेलू तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पुरस्कार वितरण तसेच पत्रकार मेळावा दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्हयातील सेलू येथे आयोजित केला आहे.
साई नाट्यगृह सेलु येथे दि.1 फेब्रुवारी 2025 रोजी सदरील कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे राहणार असून या कार्यकमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, गोपी लांडगे, गणेश मोकाशी,हेमंत वनजू, अविनाश भांडेकर, विभागीय सचिव दिपक कैतके, पी.पी.कुलकर्णी, रवी उबाळे, प्रदिप घुमटवार, शिखरचंद बागरेचा, मनोज खांबे, सचिन शिवशेट्टे, अमोल खरे, चंद्रकांत क्षीरसागर, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहायक राज्य प्रसिध्दी प्रमुख भरत निगडे, राज्य महिला आघाडी प्रमुख शिवभा जयपूरकर, डीजीटल मिडिया परिषदेचे राज्यप्रमुख अनिल वाघमारे, डीजीटल मिडिया परिषद कार्याध्यक्ष सनी शिंदे, डीजीटल मिडिया प्रमुख परिषद उपाध्यक्ष अनिल उंबरकर आदींची प्रमूख उपस्थिती राहणार आहे.
आपण सेलू येथे सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहून परिषदेने आयोजित केलेल्या एकता रॅलीत सहभागी व्हावे.
ही नम्र विनंती.
🙏🙏🙏🙏🙏
*प्रकाश कांबळे*
राज्य उपाध्यक्ष
मराठी पत्रकार परिषद, मुंबई.