वाढदिवस म्हणजे एक नवीन स्वप्न घेऊन येणारा दिवस, आशावाद घेऊन येणारा दिवस…आयुष्यातील प्रत्येक कामगिरी आणि आठवणींवर आनंदाच्या क्षणांना उजाळा देणारा दिवस म्हणजे वाढदिवस…
खुपच कमी वेळात अगदी मनापासून आपलीशी करून सानिध्यात आलेली समाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप उमटवणारी माझी सखी प्रा. सारिका बकवाड होय.हिचा जन्म १ फेब्रुवारी रोजी झाला याचेच औचित्य साधून या शब्दरूपी शुभेच्छा…
सामाजिक कार्यात स्वतःला झोकून काम करणारी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जबाबदारीने एक नवा इतिहास घडवून पाहणारी एक स्त्री कुठेही मागे नाही याचेच एक उत्तम असं उदाहरण तिने समाजापुढे ठेवला आहे. तिच्यामध्ये असलेला
सकारात्मक विचार हा प्रत्येक परिस्थितीत आशावादी ठरतो. एक सकारात्मक मन संधींची वाट पाहते आणि एक सकारात्मक दृष्टीकोन विकसित करते जे ते घडण्यासाठी प्रकट करते.
हेच सकारात्मक विचारांचा वारसा जोपसणारे व्यासपीठ म्हणजे, प्रा.सारिका बकवाड होय, निसर्ग सगळ्यांना वेगवेगळ्या प्रतिभा देवून जन्माला घालतो,पण त्या प्रतिभेच्या घनाला जो घाव सोसून घेतो तोच त्याचे सोने करतो…दगडाचा देव होण्याचे सामर्थ्य ह्या सहनशीलतेत आहे…
साहित्याचा वारसा जोपासात ज्यांनी आपली एक ओळख निर्माण करण्यात आपली प्रतिभा पणाला लावत, शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात आपले पाय रोवले आहे. एवढेच नाही तर सामाजिक प्रश्नांच्या जाणीवेतून ते प्रश्न आपल्या लेखणीद्वारे शब्दांत मांडणारे… तसेच आपल्या खणखणीत आवाजाने समोरच्यांना घायाळ करणाऱ्या प्रा.सारिका बकवाड यांना पुनश्च एकदा वाढदिवसाचे अभिष्टचिंतन…-रूचिरा शेषराव, नांदेड.