राम तरटे यांनी सादर केलेल्या ‘बारा आण्याची बोंब ‘ या कथेेस उत्स्फूर्त प्रतिसाद
मुखेड: (दादाराव आगलावे)
राज्यपुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गोविंद चव्हाण यांच्या सेवापुर्ती निमित्ताने मायबोली मराठी परिषद मुखेड आयोजित बालसाहित्य सम्मेलन सावरगाव (पीर) येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने सकाळी नऊ वाजता सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आली . साहित्य संंम्मेेलनाचे उद्घाटन मनपा नांदेडचे शिक्षणाधिकारी साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते तर डॉ. पृथ्वीराज तौर मराठी विभाग प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गोविंद चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात कथाकथनाचे आयोजन प्रसिद्ध कथाकार धनंजय गुडसुडकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. राम तरटे यांनी यावेळी ‘बारा आण्याची बोंब ‘ नावाची कथा सादर केली. तर प्रसिद्ध कथाकार धनंजय गुरसुडकर यांनी ‘धर्मा’ नावाची प्रबोधनपर कथा आपल्या खास शैलीमध्ये सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
शेवटच्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यात श्रीनिवास मस्के, गोविंद कवळे, पंडित पाटील बेळीकर , संतोष तळेगावे आदी कवी उपस्थित होते.
या प्रसंगी सावरगावचे सरपंच अली इनामदार , मायबोलीचे अध्यक्ष शिवाजी आंबुलगेकर, एकनाथ डुमणे, ज्ञानोबा जोगदंड, शेषराव वडजे, सुरेश पाटील मसलेकर, प्रभाताई राठोड, साधना पेंढारकर आदींसह मायबोलीचे सन्माननीय सदस्य साहित्यप्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.