*कंधार लोहा प्रतिनिधी संतोष कांबळे*
उजना प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी व सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि, महेश नगर, उजना यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना येथे दि. ३० जानेवारी २०२७ रोजी ऊसतोडणी, वाहतूक कामगार, कारखान्यातील कर्मचारी, कामगार व कारखाना शेजारील ग्रामस्थांसाठी सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीराचे धन्वंतरी देवीची पुजा करुन उदघाटन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख हे होते. या नियोजित कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी.होनराव तसेच, अहमदपुरचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. सायली यादव डॉ. मोहिनी कासले व तसेच डॉ. गुणाले, डॉ. वहमवार, डॉ. कराड, डॉ. मुंढे, डॉ. तनुप्रिया घोडके व डॉ. उगले इत्यादींनी उपस्थित राहुन आरोग्याची तपासणी करुन मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दुपारच्या सत्रात सर्वरोगनिदान शिबीरास भेट देवून मार्गदर्शन केले व आरोग्य विभागाच्या स्टाफचे वेळोवेळी होत असलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदन केले.
सदर शिबीरामध्ये बालरोगतज्ञ, स्त्रिरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ व तसेच जनरल फिजीशियन तज्ञ डॉक्टर उपस्थित राहुन आरोग्याची तपासणी केली. व तसेच आवश्यकतेनुसार गरोदर माता तपासणी, रक्त, लघवी, बी.पी. (उच्च रक्तदाब.) शुगर (मधुमेह), ई.सी.जी.ची तपासणी व किरकोळ सर्व रोगावर निदान करुन त्यावरील औषधे मोफत देण्यात आली. सर्वरोगनिदान शिबीरात ऊसतोडणी, वहातुक कामगार, कारखान्यातील कर्मचारी, कामगार व कारखाना परिसरातील ग्रामस्थ ४७७ इत्यादी लोकांनी आरोग्याची तपासणी करुन घेवून लाभ घेतला.
सदर प्रसंगी आरोग्य विभागाचा स्टाफ कुंभार, नाईक, सुरनर, सुदेवाड, फड, बुके व गायकवाड यांनी उपस्थित राहुन उपचार करुन ऊसतोड/वहातुक कामगार, कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, कामगार व कारखाना शेजारील ग्रामस्थांचे आरोग्याची योग्य ती तपासणी करुन बहुमोल सहकार्य केले.
याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर एस. आर. पिसाळ, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, चिफ अकौंटंट .एल.आर. पाटील, चिफ फायनांस ऑफिसर आनंद पाटील, कंपनी सेक्रेटरी एस.टी. सावंत, ऊसविकास अधिकारी वाय.आर. टाळे, ई.डी.पी. मॅनेजर
प्रशांत जाधव, परचेस ऑफिसर धनराज चव्हाण, सिव्हील इंजिनिअर साळुंके, सुरक्षा अधिकारी व्ही.एच. डोंगरे, हेड टाईमकिपर धनंजय टिळक, दुधसंकलन अधिकारी संदीप पाटील, सि. ॲग्री ओव्हरशिअर टी.बी. वाघमारे, सेफ्टी सुपरवायझर विकास राठोड, आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर सर्वरोग निदान शिबीरास हजर ऊसतोड मजुर, वहातुक कामगार व ग्रामस्थांना अल्पोपहाराची व चहाची सोय सिध्दी शुगर कारखान्याचे वतीने करण्यात आली होती. आयोजित केलेल्या सर्वरोगनिदान शिबीरासाठी ऊसतोडणी मजुर, वहातुक कामगार, व तसेच कारखाना शेजारील ग्रामस्थांने मोठ्या संख्येने उपस्थित राहुन उत्स्पूर्वक प्रतिसाद दिला.
याकामी कारखान्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेवून सर्वरोग निदान शिबीर यशस्वी करण्यास महत्वाची भुमिका बजावली.सदर कार्यकमाचे सुत्रसंचलन टेकाळेसर व आभार कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी.होनराव साहेब यांनी मानले.