उमरज येथे होणाऱ्या १०८ कुंडी विष्णूयाग यज्ञ व कलशारोहणचे दि. २ फेब्रुवारी रोजी ध्वजपूजन व कथा मंडप भूमिपूजन

 

कंधार/प्रतिनिधी

          मराठवाड्यातील सुप्रसिद्ध श्री संत नामदेव महाराज मठसंस्थान (धाकटे पंढरपूर ) उमरज ता. कंधार येथे कलशारोहण सोहळ्या निमित्त दि. २७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ १०८ कुंडी विष्णू यागयज्ञ या कार्यक्रमाचे ध्वजपूजन, ध्वजारोहण व कथा मंडप भूमीपूजन दि.२ फेब्रुवारी रोजी साधुसंत महंत यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र उमरज येथे संपन्न होणार आहे

            मराठवाडा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत नामदेव महाराज संस्थान श्रीक्षेत्र उमराज  ता.कंधार येथे श्री संत नामदेव महाराज मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि २७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार श्री देवकीनंदनजी ठाकूर श्रीक्षेत्र वृंदावन धाम यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा होणार आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी यांच्याहस्ते कलशारोहनाचा मुख्य सोहळा होणार आहे. तसेच या सप्ताह दरम्यान १०८ कुंडी विष्णूयाग यज्ञ संपन्न होणार आहे.
             या कथा स्थानाचे व यज्ञ स्थानाचे धर्मध्वज पूजन, कथा मंडप भूमिपूजन श्री क्षेत्र उमरज संस्थांचे मठाधिपती श्री संत एकनाथ गुरु नामदेव महाराज व नराशम महाराज येवतीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या आढावा बैठकीसाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मुख्य कार्यकारीधिकारी मिनल करनवाल, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. अनुष्का शर्मा, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार रामेश्वर गोरे आदी दि.२ फेब्रुवारी रोजी दुपारी उमरज येथे येणार असून या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मठाधिपती श्री संत एकनाथ गुरु नामदेव महाराज यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *