बिलोली ता.प्र.
नुकतच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या खरीप पिकाचे तालुक्यातील बाधीत शेतक-यांनी इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स या पिक विमा कंपनीकडे तत्काळ नोंदनी करुन घ्यावेत असे आव्हाण तालुका कृषि अधिकारी आर.एल. पसलवाड यानी केले आहे.
तालुक्यात दि.१४ व १५ सप्टेंबर रोजी आतिवृष्टीच्या नैसर्गिक आपतीमुळे खरीप पिक उडीद,सोयाबिनसह आनेक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ज्या शेतक-यांनी पंतप्रधान पिक विमा इफ्को-टोकियो इन्शुरन्स कंपनीकडे खरीप पिक विमा काढलेला आहे आशा नुकसानग्रस्त बाधीत शेतक-यांनी पिक नुसकानीची तात्काळ सदर विमा कंपनीकडे नोंदनी करणे अत्यावश्यक आसुन आज दि.१९ सप्टेंबर पर्यत तालुक्यातुन फक्त १३०० शेतक-यांनीच पिक नुकसानीचे विमा कंपनीकडे नोंदी केलेल्या आसुन उर्वरीत बाधीत शेतक-यांनी play store मधुन crop insurance हे अँप्लिकेशन dounload करुन अथवा 18001035490 या टोल फ्रि क्रमांकावर झालेल्या पिक नुकसानीची माहिती सदर विमा कंपनीकडे तात्काळ करावी आसे आव्हाण बिलोली तालुका कृषि अधिकारी आर.एल. पसलवाड यानी केले आहे.तसेच प्रशासनच्या वतिने देखिल कृषि व महसुल विभागाकडुन तात्काळ सदर नुसकानीचे पंचनामे करण्यात येणार आसल्याचे तहसिलदार विक्रम राजपुत व तालुका कृषि अधिकारी पसलवाड यानी सांगितले.#IPL20