बिलोली प्रतिनिधी :
बिलोली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत तर पुराचे पाणी अनेक घरात शिरल्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आले आहेत या सर्व नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी या मागणीचे निवेदन बिलोली उपविभागीय अधिकारी यांना मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे .
बिलोली तालुक्यात 14 ते 16 सप्टेंबर च्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बिलोली तालुक्यातु वाहणाऱ्या लेंडी मन्याड नदीला महापूर आल्यामुळे नदीकाठच्या शिवारातील शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरून येथील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेकडो हेक्टरवरील शेतात पाणी शिरून तेथील पीक वाया गेले आहे
अतिवृष्टीमुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन तूर कापूस उडीद ज्वारी ऊस केळी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने तात्काळ तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्यांची खरी परिस्थिती शासन दरबारी मांडून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व
शासकीय अधिकाऱ्यांना बिलोली तालुक्यात कुठेही फिरू देणार नाही असाही सज्जड इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने दिला आहे सध्या शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना यात अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या असे वर विरजण पडले आहे या अगोदर मुग या पिकाचे अतोनात नुकसान झाले या नुकसानीमुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळू शकली नाही यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकाच्या भरोशावर बिलोली तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तर कर्ज काढून बियाणे खते फवारणी औषधांची खरेदी केली होती.
परंतु अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे आता या शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नना सोबतच घेतलेले कर्ज कसे फेडावे ? या चिंतेने आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अन्यथा तालुक्यात एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही असेही मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी बिलोली यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
यावेळी विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना संपर्कप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख ओमराजे पाटील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती पाटील भागानगरे जिल्हा सल्लागार भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख नायगाव श्रीनिवास पाटील मुरके तालुकाप्रमुख बिलोली संदीप पाटील पवार जिल्हा सचिव संभाजी पाटील पवळे तालुकाध्यक्ष कंधार प्रदीप पाटील मुरके तालुका उपाध्यक्ष बिलोली श्रीनिवास पाटील मुरके तालुका सचिव बिलोली साईनाथ पाटील नरवाडे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष बिलोली ऋषिकेश पाटील ढगे तालुका कार्याध्यक्ष बिलोली यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते दिलेल्या निवेदनाच्या प्रती मा श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अशोकरावजी चव्हाण साहेब पालकमंत्री नांदेड जिल्हा जिल्हा अधिकारी नांदेड पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांना दिले आहेत#IPL2020