नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्तींचा मृत्यू आज 240 कोरोना बाधित

  नांदेड दि. 20

  रविवार 20 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 324 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 240 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 108 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 132 बाधित आले. आजच्या एकुण 996 अहवालापैकी  687 अहवाल निगेटिव्ह आले. 

जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 13  हजार 556 एवढी झाली असून यातील 9  हजार 378 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 755 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 42 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  या अहवालात एकुण 6 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुलेनगर नांदेड येथील 29 वर्षाच्या एका पुरुषाचा, शनिवार 19 सप्टेंबर रोजी कंधार तालुक्यातील पेठवडज येथील 57 वर्षाच्या एका पुरुषाचा, नमस्कार चौक नांदेड येथील 90 वर्षाच्या एका पुरुषाचा तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी जोशी गल्ली नांदेड येथील 67 वर्षाच्या एका पुरुषाचा, 19 सप्टेंबर रोजी देगलूर नाका नांदेड येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा,

रविवार 20 सप्टेंबर रोजी औराळा कंधार येथील 40 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 356 झाली आहे.    आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12,

अर्धापूर कोविड केंअर सेंटर 11, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 7, किनवट कोविड केंअर सेंटर 17, मुखेड कोविड केंअर सेंटर 24, उमरी कोविड केंअर सेंटर 11, खाजगी रुग्णालय 27, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 24, बिलोली कोविड केंअर सेंटर 21, कंधार कोविड केंअर सेंटर 9, लोहा कोविड केंअर सेंटर 11, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन, होम आयसोलेशन 149, हैदराबाद येथे संदर्भीत 1 असे 324 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.


आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 72, कंधार तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 4, मुखेड तालुक्यात 2, बिलोली तालुक्यात 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 4, अर्धापूर तालुक्यात 4, नायगाव तालुक्यात 5, मुदखेड तालुक्यात 2, हिंगोली 7, यवतमाळ 2 असे एकुण 108 बाधित आढळले.  तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 47,  हदगाव तालुक्यात 4, अर्धापूर तालुक्यात 12, किनवट तालुक्यात 5, बिलोली तालुक्यात 10, उमरी तालुक्यात 9, धर्माबाद तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 3, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड तालुक्यात 5, लोहा तालुक्यात 6, कंधार तालुक्यात 2, भोकर तालुक्यात 8, नायगाव तालुक्यात 1, हिमायतनगर तालुक्यात 9, यवतमाळ 4 एकुण 132 बाधित आढळले जिल्ह्यात 3 हजार 755 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 284, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 828, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 65, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 49, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 130, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 52, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 138,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 67, लोहा कोविड केअर सेंटर येथे 62, हदगाव कोविड केअर सेंटर 55, भोकर कोविड केअर सेंटर 38, कंधार कोविड केअर सेंटर येथे 44, बारड कोविड केअर सेंटर 28, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 48, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 30, मुदखेड कोविड केअर सेटर 46, 

माहूर कोविड केअर सेंटर येथे 25, किनवट कोविड केअर सेंटर येथे 183, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 46, उमरी कोविड केअर सेंटर 78, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 22,  खाजगी रुग्णालयात दाखल 352, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड 82, औरंगाबाद 2 व निजामाबाद येथे संदर्भित  झाले आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *