नांदेड; दि 20
नांदेड जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पदभार स्विकारला. या वेळी तत्कालीन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
अपर आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या भारतीय पोलिस सेवेतील 22 अधिकार्यांना पोलिस अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.
यामध्ये ठाणे येथील अपर पोलिस आयुक्त असलेल्या प्रमोद शेवाळे यांना नांदेड पोलिस अधीक्षक म्हणून पदस्थापना मिळाली आहे. मात्र विजयकुमार मगर यांच्यासह इतर पंधरा पोलिस अधीक्षकांना शासनाने पदस्थापना दिलेली नाही.
तेरा महिन्यांचा कार्यकाळ मिळालेल्या पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी खंडणी गँगचे कंबरडे मोडून काढले. आतापर्यंत 70 जणांना जेरबंद केले. एकाचा एन्कॉउंटर तर एकास गोळी घालून जायबंदी करण्याची कारवाई त्यांच्याच काळात घडली. तशाच प्रकारे खाकीचा धाक प्रमोद शेवाळे यांना येणार्या काळात दाखवावा लागणार आहे. अन्यथा खंडणीगँग तसेच इतर लुटारू वृत्तीचे गुन्हेगार डोकेवर काढू शकतात.