कंधार ; प्रतिनिधी
संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा ता कंधार या शाळेतील एस.एस.सी. मार्च २०२५ इ.१० वी परीक्षेत विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा एकुण निकाल 84% लागला आहे.शाळेतील विद्यार्थी ओमकार मारुती गित्ते याने 93.40 % गुण घेऊन शाळेतून प्रथम स्थान पटकावले आहे तर दुसऱ्या क्रमांकावर नंदनी देविदास बेंद्रीकर ही असुन तिने 85.20%गुण मिळवले आहे .सृष्टी कैलास जाधव या विद्यार्थिनीने 82.40% गुण मिळून तिसऱ्या क्रमांकावर यश संपादन केले. तसेच संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित महात्मा फुले विद्यालय नवामोंढा संभाजी नगर कंधार या शाळेतील 10वी परीक्षेत विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा १००% निकाल लागला आहे . तसेच करण बालाजी गुटे याने सुमारे 96 . 20 % गुण घेऊन शाळेतून प्रथम स्थान पटकावले आहे .तसेच अनेकांनी घवघवीत यश संपादन केले आहे .या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या यशाबद्दल संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन.केंद्रे ,सचिव चेतनभाऊ केंद्रे ,माजी नगराध्यक्षा तथा संस्था संचालीका सौ.अनुसया चेतन केंद्रे , जे जी केंद्रे,मुख्याध्यापक, नागरगोजे डी.वाय.प्रा.के.डी.मुसळे,पी.एस.आय.निळकंठ संग्राम गित्ते व सर्व कर्मचारी यांनी
त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.