कंधार (ता.प्र)
कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस (बु) येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2569 व्या जयंती निमित्त व डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त युवा सेना शिंदे गटाच्या वतीने महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका तथा लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात या भीम गीताच्या गायिका मंजुषा शिंदे यांच्या भीम गीतांचा भारदस्त कार्यक्रम दि.13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता केले असुन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन युवा सेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे यांनी केले आहे.दि.13 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मौजे दिग्रस (बु) ता.कंधार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका सौ.मंजुषा शिंदे यांच्या भीम गीतांचा भारदस्त कार्यक्रम युवा सेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे यांनी आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांची उपस्थिती राहणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदभाऊ बोंढारकर व प्रमुख पाहुणे म्हणून रामदास पाटील सुमठाणकर राज्य कार्यअध्यक्ष दिव्यांग सेल राष्ट्रवादी काँग्रेस,सुधाकर आण्णा कांबळे उपनगराध्यक्ष नगर परिषद कंधार,पंचशिल दादा कांबळे नगरसेवक लोहा,गजु भाऊ किडे नगरसेवक जळकोट,विलास आण्णा कांबळे मा.तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कंधार,मयुर कांबळे संपादक महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह,संदीप भाऊ घोडजकर सामाजिक कार्यकर्ते नांदेड,कपिल भाऊ सोनकांबळे युवानेते नांदेड,नवनाथ भाऊ बनसोडे युवा नेते फुलवळ,महेंद्र भाऊ ससाणे अहमदपूर,सचिन बुकटे उपसरपंच उमरगा,तर विशेष उपस्थिती विनय भाऊ गिरडे शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड दक्षिण,उमेश मुंडे शिवसेना जिल्हा प्रमुख मुखेड / देगलूर/ अर्धापूर, ओमदासिंघ साबळे युवासेना जिल्हा प्रमुख नांदेड दक्षिण,साईनाथ विभुते युवा सेना जिल्हा प्रमुख मुखेड, सचिन पाटील भिसे युवासेना उपजिल्हाप्रमुख मुखेड, सचिन भाऊ पेंढारकर युवा सेना तालुकाप्रमुख हिंगोली, नवनाथ राठोड युवा सेना तालुकाप्रमुख कंधार, नंदाजी इंगळे युवा सेना तालुकाप्रमुख लोहा, गजानन साखरे युवा सेना तालुकाप्रमुख मुखेड, माणिक कांदे युवा सेना तालुका उपप्रमुख कंधार, सुनील गीते युवासेना उप तालुका प्रमुख कंधार, संदीप सोलंकर युवासेना सर्कल प्रमुख कुरळा, सचिन श्रीरंगवाड युवा सेना शहरप्रमुख कंधार, विजय पाटील चव्हाण युवा सेना शहरप्रमुख लोहा, बालाजी बाबळे युवासेना शहरप्रमुख मुखेड संदीप काळम,रुपेश पवार आदींची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे तरी या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थितीत राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन युवा सेना शिंदे गट उप जिल्हा प्रमुख सचिन भाऊ जारीकोटे यांनी केले आहे.