नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्यांना दोन मिनिटं मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याचबरोबर नांदेडचे वीर सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मा. इंजि. श्री. शेषरावजी चव्हाण, मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री. सुशांत राठोड, नांदेडचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. संतोष राठोड, श्री., नांदेडचे माजी नगरसेवक श्री. उदय चव्हाण आदी मान्यवरांसह अनेकांनी पक्षात प्रवेश केला. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येकाचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असं आश्वस्त केलं. तसंच जिल्ह्यातील विकासकामांशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास व्यक्त केला.
Mohanrao Hambarde – मोहनराव हंबर्डे