फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
नुकताच एसएससी बोर्ड शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कंधार तालुक्यातील फुलवळ येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचा ९४.५९ % एवढा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांसह पालक व गुरुजनांत आनंदाचे वातावरण निर्माण होऊन समाधान व्यक्त केले जात आहे.
शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान संचिता दिगंबर मंगनाळे हिने ९६.४०% गुण मिळवून प्राप्त केला आहे तर द्वितीय येण्याचा शिवम मन्मथ आमलापुरे ने ९४.२०% गुण मिळवून घेतला असून वैष्णवी जयवंत हात्ते ने ९२.८० % गुण प्राप्त करून तिसरे स्थान पटकावले आहे.
सदर शाळेतुन एकूण ७४ विद्यार्थी एसएससी बोर्ड परिक्षेला बसले होते त्यापैकी ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याविद्यार्थ्यांपैकी ८० टक्के चा टप्पा ओलांडणारे २१ विद्यार्थी आहेत. तर ६० टक्केच्या पुढचे २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष वैजनाथराव सादलापुरे , सेवानिवृत्त कृषी अधिकारी विश्वांभरराव मंगनाळे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसवेश्वर मंगनाळे , मुख्याध्यापक बी एन मंगनाळे , वर्गशिक्षक चंद्रकांत फुलवळकर , संपुर्ण शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

