
संत नामदेव महाराज विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षानंतर भेट …! चंद्रकांत तेलंगे यांच्या पुढाकारातून स्नेहसंमेलन संपन्न
मुखेड: दादाराव आगलावे
तालुक्यातील संत नामदेव महाराज विद्यालय दापका (राजा) येथील शैक्षणिक वर्ष 2005 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे या शाळेतील माजी विद्यार्थी चंद्रकांत तेलंगे यांच्या पुढाकारातून स्नेहसंमेलन संपन्न झाले. त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
संत नामदेव महाराज विद्यालय दापका (राजा) येथील शैक्षणिक संकुल ग्रामीण भागातील एक आदर्श ठरलेले आहे. अत्यंत ग्रामीण भागातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करत शैक्षणिक आलेख हा वरच्यावर उंचावलेला असतो. सदरील शाळेतील 2005 मध्ये दहावीची पहिली बॅच बाहेर पडली. दापका येथील चंद्रकांत तेलंगे, माणिक लोहकरे, संतोष सरकाळे, मोहन राठोड, गंगाधर सरकाळे यांच्या पुढाकारातून वीस विद्यार्थी व दहा विद्यार्थ्यांनी असे 30 माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शाळेच्या भव्य प्रांगणात संपन्न झाले. खेळीमेळीच्या वातावरणात झालेली प्रगती, अधोगती यांचा वाहपोह दिवसभर करण्यात आला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगतही यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी डावकरे, सहशिक्षक वसंत चव्हाण, बुद्धाजी किनवाड, तत्कालीन शिक्षक पुरुषोत्तम भोसले, सतीश मस्कले, सचिन बादेवाड, एस. पी. देवकते, श्रीरामेसर, श्रीराम पवार, अशोकमामा धुळशेटे यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेसाठी माजी विद्यार्थांनी रंगीत टीव्ही भेट देऊन शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रकांत तेलंगे यांनी केले मिष्टांन्न भोजनाने स्नेहसंमेलनाची सांगता झाली. यावेळी चंद्रकांत तेलंगे, माणिक लाडेकर, ओमकार गोंड, निलेश पवार, संतोष सरकाळे, मोहन राठोड, प्रदीप चव्हाण, जनार्दन तेलंग, प्रकाश तेलंग, किशन आंदे, ज्ञानेश्वर पांचाळ, मारुती जोगदंड, गंगाधर सरकाळे, प्रवीण फुलारी, गोविंद तेलंग, चंद्रकांत चिलपिपरे, विठ्ठल जोगदंड, गणेश शिंदे, राजश्री पाम्पटवार, मायावती गायकवाड, सलीमा मुन्शी, शोभा गायकवाड,जयश्री कदम, श्रीमती राठोड, कल्पना गौतम गायकवाड, कल्पना वामन गायकवाड, मधुबाला बिजले, प्रतिभा सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील शाळेत अशा प्रकारचे स्नेहसंमेलन पहिल्यांदाच होत असल्यामुळे संत नामदेव महाराज विद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.