इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि दुसरा सामना रोमांचक ठरला. दिल्ली टीमने पंजाबला सुपरओव्हरमध्ये पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने मार्कस स्टॉयनिसच्या आतिशी अर्धशतकाच्या जोरावर ८ गडी गमवत १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब संघाने मयंक अग्रवालच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर ८ गडी गमवत १५७ धावा केल्या आणि सामना बरोबरीत आला.
स्कोअर बरोबरीनंतर सुपर ओव्हर झाली. दिल्लीसाठी रबाडाने बॉलिंग करत पंजाबला २ धावांवर बाद केले. पंजाबकडून फलंदाजीसाठी आलेले कर्णधार केएल राहुल दोन धावा काढून बाद झाला तर ग्लेन मॅक्सवेल खाते उघडू शकला नाही. तिसऱ्या बॉलवर ही विकेट गेली. दिल्लीने हे आव्हान सहज पूर्ण केले.