कंधार ; प्रतिनिधी
शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दलित समाजातील अर्बन नक्षलवाद आणि अॅट्रोसिटी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्याचा समस्त बौद्ध व बहुजन समाज बांधवांच्या वतीने शुक्रवार, दि.१८ जुलै रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला, याप्रसंगी निषेधाचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी आमदार हेमंत पाटील यांची आमदारकी रद्द करा, तसेच त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सुधाकर कांबळे, नवनाथ बनसोडे, महेंद्र गायकवाड, माधव कांबळे, अनिल कदम, सदानंद जोंधळे, मधुकर सोनकांबळे, भास्कर कदम, गणेश कांबळे, मोहम्मद सिकंदर, विनोद कांबळे, मयुर कांबळे, एन.डी.जाभाडे, निलेश गायकवाड, माणिक ढवळे आदींसह बौद्ध व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

