(कंधार ; दिगांबर वाघमारे )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, सहकार चळवळीतील बुलंद आवाज, आमच्या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कालवश मा. हरिहरराव भोसीकर साहेब यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष तथा संचालक पदाच्या जागी साहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा मौजे पानभोसीचे उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तरुण तडफदार चेहरा माननीय शिवकुमार हरिहरराव भोसीकर यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करून सर्वपक्षीय सभासदांनी कालवश हरिहरराव भोसीकर साहेबांच्या कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली आहे .
शिवाय या निवडीतून संचालक मंडळाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आजचा क्षण सर्वांना भावनिक साद घालून गेला. उपस्थित संचालक मंडळाने ज्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेचे माननीय अध्यक्ष माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी हरिहर भोसीकर साहेबांच्या आठवणींना उजाळा देत गोरगरिबांप्रती साहेबांची असणारी निष्ठा, तळमळ, त्याग आणि दायित्व याची आठवण करून दिली. याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तसेच लोहा कंधार विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भोसीकर साहेबांसोबत च्या जिल्हा परिषद असेल किंवा मध्यवर्ती सहकारी बँक असेल येथील विविध प्रसंगाची आठवण करून दिली आणि नवनियुक्त संचालक शिवकुमार हरिहरराव भोसीकर यांना साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरित केले.याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे खासदार मा. रवींद्र जी वसंतराव चव्हाण यांनी या नव्या रक्ताच्या तरुण तडफदार संचालकास शुभेच्छा दिल्या.या निवडीसाठी आवर्जून उपस्थित असणारे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सुद्धा निवडणूक संचालक शुभम शिखर यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला.या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. विविध खेडेगावातून आलेल्या भोसीकर प्रेमी मंडळींनी ज्यामध्ये विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे पोलीस पाटील, ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायट्यांचे चेअरमन आदी मान्यवरांनी पुष्गुच्छ हारतुरे देऊन शिवकुमार भोसीकर यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

