मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांचा संविधानिक हक्क होय, आरपीआय डेमोक्रॅटिक मैदानात:- पँथर डॉ राजन माकणीकर

 

        मुंबई : दि (प्रतिनिधी)

मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक हक्क असून आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे मत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.     

   मराठा समाजाला समविधान निर्माते भारत भाग्य विधाते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे दिले होते मात्र तत्कालीन गडगंज मराठ्यांनी ते आरक्षण नाकारले मात्र; मराठा आरक्षण हा मराठयांचा संविधानिक हक्क असून त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळालेच पाहिजे असे पत्रकात नमूद आहे.     

         पुढे असेही म्हंटले आहे कि महाराष्ट्र राज्य गठीत न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मराठा जातीचा सामाजिक शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासून अहवाल सादर केला त्यानुसार आणि भारतीय संविधान कलम 340 प्रमाणे आरक्षनास पात्र आहे.       

   राज्य शासनाने ओबीसी आरक्षण ए.बी.सी.डी प्रमाणे विभागले असून अश्याचं पद्धतीने ओबीसी अंतर्गत वेगळी आखणी करून काहीं अंशीप्रमानात आरक्षण देता येऊ शकते.             न्यायमुर्ती गायकवाड आयोगाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षणास सकारात्मक अहवाल दिल्याने ओबीसी आरक्षण मिळने गरजेचे आहे आणि ते मिळणारच असेही पत्रकात स्पष्ट केले आहे.   

          आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात लोकसभा व विधानसभेत सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष असून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षातील प्रमुखांना भेटून मराठा ओबीसी आरक्षण देण्यास भाग पाडू असेही पत्रकात पक्षातर्फे आश्वाशीत करण्यात आले आहे.            मराठ्यांना ओबीसी  व धनगर आरक्षणासाठी पक्षाच्या वतीने समर्थन असून नाही दिल्यास राज्यभर आंदोलन उभारू असा इशाराही डॉ माकनिकर यांनी दिला आहे.     

    पँथर डॉ माकनिकर, राज्य महासचिव श्रावण गायकवाड, बंजारा सेल राज्य प्रमुख शिवाभाई राठोड, रोहित डावरे, राजेश पिल्लई, मनीष यादव, स्वप्नील गायकवाड, उमेश जगताप, विजय चव्हाण व गौतम कांबळे पाठपुरावा करत असल्याचेही पत्रकात सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *