———————————————–
नांदेड ;
गेल्या अनेक दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी तर फिरले पण शेतातील उभे असलेल्या पिकांना जाग्यावर मोड फुटले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे या अगोदर पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना उसनवारी व व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागली त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांना पिककर्ज बँकांनी दिले नाही
त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज कसे फेडावे व आपला परिवार वर्षभर कसे जगावे असा प्रश्न नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना पडला आहे कधी अतिवृष्टी तर कधी रोगराईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे यात शेतकऱ्यांना रसगट नांदेड जिल्ह्यातील शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी व अति पावसाने नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना दिलासा वाटेल दररोज शेतकऱ्यावर संकटाचा डोंगर कोसळत आहे
त्यासाठी घेतलेले कर्ज कशाने फेडावे या चिंतेत नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे त्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सरसगट शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांना द्यावेत आणि शेतकऱ्यांना दिलासादायक नुकसान भरपाई देण्यात यावी या अस्मानी संकटामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे
त्यासाठी शेतकऱ्यांना शेतात पिकले तर घरात खायला मिळते ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातच पिकले नाही तर शेतकर्यांच्या घरात कुठून येणार असाही प्रश्न शेतकर्याना पडला आहे त्यासाठी वर्षभर खावे काय आणि कर्ज फेडावे काय त्यामुळे तात्काळ शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून हेक्टरी ५०००० रु शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करावे व नांदेड जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन
मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने नांदेडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड नांदेड जिल्हा प्रमुख ओमराजे पाटील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड संदीप पाटील पवार जिल्हा सचिव भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष नायगाव श्रीनिवास पाटील मूर्के तालुकाध्यक्ष बिलोली संभाजी पाटील तालुकाध्यक्ष कंधार शिवाजी पाटील शिंदे परमेश्वर भागानगरे बाळासाहेब पाटील सर्जे महादेव पाटील शिंदे माणिक पाटील शिंदे ांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते व दिलेल्या निवेदनावर त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.