नायगांव ;
येथील होळाटकर यांच्या मिलीनियम पब्लिक स्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत नायगांव तालुक्यातील अनेक युवकांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आणि माझ्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पा होटाळकर, प्रदेश सरचिटणीस वसंत पा सुगावे, युवकचे जिल्हाध्यक्ष बालाजी पा शिंदे नागणीकर, युवा नेते सचिन पा चिखलीकर, प्रा जीवन पा चव्हाण, माजी जि प सदस्य विनायक पा शिंदे, नवनिर्वाचित महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सोनालीताई हंबर्डे आदीजण उपस्थित होते.
याप्रसंगी संबोधित करताना युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि नेतृत्वगुण आहेत. ही ताकद संघटनेच्या माध्यमातून समाजहितासाठी वापरली जावी यासाठी त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. युवकांनी संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करावे, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवावीत असे आवाहनही त्यांनी केले. भविष्यात नायगांव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी संदीप पा कदम, नायगांव विधानसभा अध्यक्षपदी श्रीकांत पा शिंदे मांजरमकर, रा यु काॅ जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश बेलकर, आनंद पा हेंडगे, रा यु कॉ जिल्हा संघटक पदी दयानंद पा मोरे, गजानन पा शिंदे मनुरकर, अपंग – दिव्यांग सेलच्या तालुका अध्यक्षपदी रामदास पा भाकरे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी सटवाजी मोदलवाड, अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी अफरोज चौधरी, किसान सेलच्या तालुकाध्यक्षपदी माधव पा उपासे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास श्रीपत पा शिंदे, प्रदिप पा पवळे, रावसाहेब पा बेलकर, आनंदराव पा शिंदे व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
#ncp4nanded #nanded #naigaon #ncp
#AjitPawarSpeaks #AjitPawar
.
.
NCPSpeaks_Official | Ajit Pawar

