कंधार ; प्रतिनिधी
माजी नगराध्यक्ष कंधार, महात्मा फुले दलित वस्तीगृहाचे अध्यक्ष स्मृर्तीशेष भाई पंढरीनाथराव माणिकराव कुरूडे यांचं आज दि.१५ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झालं. त्यांची अंत्यविधी छोटी दर्गा ते कंधार स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आले.
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत, कंधार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढयातील लढवय्यवीर,निजामाच्या रजाकारीना वैतागुन गेलेल्या मराठवाड्यातील तरुण निजामावर बाॅम्ब टाकण्याची मनिषा बाळगणारे व्यक्तिमत्व,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे व बंधु माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांच्या तालिमीत वाढलेले.
निधड्या छातीचे राजकारणातील धेय्यवादी.२५ जुन १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधीच्या देशातील आणीबाणीविरुद्ध सत्याग्रहाच्या माध्यमातून काडाडून विरोध करणारे सत्याग्रही वीर,कंधार शहरातील धुरंधर राजकारणी,निर्भीडपणे स्पष्टपणे भुमीका मांडणारे.श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारच आधारारंभी,मातृशाखा श्री शिवाजी मोफत हायस्कूल गवंडीपार कंधार या ज्ञानालयातील आदर्श गुरुजी,स्वत:संस्थापक व संचालक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे, भाई गुरुनाथरावजी कुरुडे , भाई बापूरावजी वाडीकर, भाई शिवाजीराव बोधगीरे,भाई राजेश्वररावजी आंबटवाड,भाई बाबासाहेब पा.लूंगारे यांचे सोबत ज्ञानदानाचे पवित्र कार्य दिवंगत भाई पंढरीनाथराव कुरुडे हे गुरुजी उप्राथमिने समाजात सुपरिचीत होते.कडक पण निर्वीर्य व्यक्तिमत्व सर्वाना गारुड घालणारे भाई इहलोकी यात्रा संपवून आज दि.१५ डिसेंबर २०२५ रोजी या मोहिनीमय जगाचा निरोप घेतला.त्यांच्या पश्चात दोन पत्नी मुलगा सुनिल, अनिल,सौ.संगीता व सौ.दीपा नातू,नात असा मोठा परिवार आहे.दिवंगत भाई पंढरीनाथराव कुरुडे यांना भावपूर्ण आदरांजली।

