कंधार ; (दिगांबर वाघमारे )
शिक्षण विभाग पंचायत समिती कंधार यांच्या वतीने तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन दि.१६ डिसेंबर रोजी श्री गणपतराव मोरे विद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेनी भरभरून प्रतिसाद दिला.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे,गटविकास अधिकारी महेश पाटील व गटशिक्षणाधिकारी वसंत मेटकर यांच्या हस्ते झाले .
केंद्रप्रमुख प्रवीण पाटील, माधव कांबळे,एन एम वाघमारे, मुख्याध्यापक संजय वागलगावे, पंचायत समिती विषय शिक्षक शिवकुमार कनोजवार,येरमे ओमप्रकाश,नरहारी प्रशांत आणि परीक्षक उपस्थित होते.परीक्षणानुसार कंधार तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी या शाळेचा पिक प्रोटेक्शन सिस्टीम अँड फार्मर सेफ्टी हा प्रयोगाने लहान गटातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.कु श्रुती निळकंठ तेलंग,कु श्रेया अनिल मोरे,(वर्ग सातवा )विज्ञान विषय शिक्षीका सौ सोनाली अगरकर यांनी हा प्रयोग सादर केला . सतत गेल्या तिन वर्षापासून शाळेने प्रथम पारितोषिक पटवून सलग यशाची हॅट्रीक केली अशी माहिती मुख्याध्यापिका सौ निलीमा गजकुमार यंबल (शहापुरे) यांनी दिली.
दरम्यान कंधार येथे संपन्न झालेल्या या विज्ञान प्रदर्शनात लहान गट द्वितीय क्रमांक गणपतराव मोरे विद्यालयाच्या स्वराज मोरे,कृष्णा मोरे यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गऊळ येथिल कु वैष्णवी व अनिल गुट्टे यांच्या प्रयोगाने पटकावला.तर मोठ्या गटातून प्रथम क्रमांक शहरातील मनोविकास विद्यालयाच्या निवृती आहेरकर,भगवड गेचडे यांच्या हरीत ऊर्जा प्रयोगाने पटकावला तर द्वितीय क्रमांक गुंटूरच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या ओंकार कांबळे ,तानाजी शिंदे यांच्या जलशुद्धीकरण उपकरण यंत्र यास मिळला आणि मोठा गट तृतीय क्रमांक श्री शिवाजी विद्यालय दिग्रस च्या समर्थ व संस्कृती कुलकर्णी या बहिणभावाच्या प्रयोगास मिळाला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे .

