मुखेड: (दादाराव आगलावे)
निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीने मला अतिशय आनंद होतोय बाराशे वर्षांचा इतिहास आणि दशरथ ईश्वराचा आशीर्वाद या मुखेड नगरीच्या पाठीशी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचे आमदार आपल्या मुखेडला लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास करताना शिक्षित अशा प्रकारची उमेदवार नगर परिषदेच्या निवडणुक निमित्ताने त्यांनी दिलेले आहेत. मुखेड नगर परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या पाठीमागे आपण राहावे, आ. डॉ. तुषार राठोड व विजयाताई पत्तेवार यांच्या पाठीमागे महाराष्ट्र सरकार राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस यांनी केले.
मुखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा प्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, संजय कौडगे,आ. जितेश अंतापुरकर, अमरनाथ राजूरकर, किशोर देशमुख, संतुकराव हांबर्डे, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, सौ.पूनमताई पवार, देविदास राठोड, सौ.अनिताताई चोंडीकर (गोपछडे), सौ. चित्ररेखा गोरे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विजया राम पत्तेवार सर्व निवडणूक रिंगणातील भाजपाचे उमेदवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, 63 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली पुढच्या तीन महिन्यांमध्ये या योजनेचे काम पूर्ण होईल. भूमिगत गटार योजनेचा 108 कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहे हे आपल्याला आश्वासन देतो निवडणूक संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल. मुखेडच्या आसपास खूप वस्ती झाली आहे वस्ती वाढीस मी लवकरात लवकर मान्यता देईन. या ठिकाणी एमआयडीसी असली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही तुषार भाऊंनी केली आहे, निश्चितपणे आपल्याला एमआयडीसी या ठिकाणी मंजूर करेन आणि त्यात उद्योगही आले पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करू.रेल्वे लाईनसाठी केंद्र सरकार 50% पैसे देईल आणि पन्नास टक्के पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. कृषी उत्पन्न बाजार समितीला आता जागा कमी पडते आहे निश्चितपणे कृषी उत्पन्न बाजार समितीला ही वाढीवची जागा द्यायची आहे ती सांगा आपण जे मागणी केलेली जागा आहे ती तात्काळ उपलब्ध करून देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण त्या ठिकाणी करू. आपल्याला लेंडी सारखा प्रकल्प अनेक वर्ष थकला होता तुषार राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात काम झालं खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला पण अजूनही विस्थापितांचे काही पैसे द्यायचे आहेत त्याला प्राधान्य देण्यात येईल आणि मागच्या बजेटमध्ये त्यासंदर्भात आपण सगळ्यांनी उपलब्ध करून या विस्थापितांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील सोडवण्याचा काम आपण करू. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना त्यांनी मुखेड तालुक्यातील ‘लखपती दीदी’ जास्तीत जास्त प्रमाणात कशा होतील याचाही विचार करू असे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकात आमदार डॉक्टर तुषार राठोड म्हणाले की, मागील निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे बहुमत आलं परंतु अल्पमताने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि यामुळे सभागृहांमध्ये केवळ राजकारण झालं परंतु या शहराचा विकास होऊ शकला नाही.पाच वर्ष विकासाच्या बाबतीमध्ये हे शहर पाठीमागे गेलं तेव्हा राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि नगरपालिकेचा कालावधी संपला आणि सरकार माझ्या नगरपालिकेवर प्रशासक आले त्यानंतर त्या शहरातले रस्त्यांची काम असतील नाल्यांची काम असतील शहरांमध्ये बांधलेले विजेचे खांब असतील, साठकोटी रुपयांचा निधी 2022 नंतर माझ्या माध्यमातून मी मंजूर केला. वाढीव वस्तीमध्ये नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने 63 कोटी रुपयांची वेगळी योजना या गावासाठी आपण मंजूर केली या योजनेचे काम आम्ही सुरू केलेले आहे पुढच्या तीन-चार महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि शहरातील सर्व भागांमध्ये सर्व नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. या शहरातील प्रत्येक घरात आम्ही भेट दिली आणि या भेटीदरम्यान मला असं जाणवलं की या शहरांमध्ये सांडपाणी शहराच्या बाहेर जात नाही अनेक ठिकाणी नाल्या तुटलेले आहेत आणि सांडपाणी त्या ठिकाणी थांबलेला आहे अनेक आमच्या माता भगिनींनी तक्रार केली की हे सांडपाणी शहराच्या बाहेर गेलं पाहिजे आणि मी त्यांना सांगितलं की निवडणूक सुरू होण्यापूर्वी याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आता या पाण्यांच्या माध्यमातून हे पाणी बाहेर जाऊ शकत नाही आता हे शहर मोठं झालेलं आहे या शहराला जोपर्यंत भूमिगत गटार योजना मंजूर होणार नाही तोपर्यंत शहरातली ही घाण बाहेर जाणार नाही म्हणून 108 कोटी रुपयांचा प्रस्ताव निवडणुकीच्या पूर्वी आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे या निवडणुकीनंतर लगेचच या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता आणि प्रदान करू आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये हे सगळं सांडपाणी आता बंद नलिकेतून पाईपच्या माध्यमातून शहरात बाहेर जाईल. ही घाण आम्ही शहरा बाहेर अशीच टाकणार नाही तर त्या ठिकाणी आम्ही सिवेक ट्रीटमेंट करून एसटीपी त्या ठिकाणी उभा करून या पाण्यावरती आम्ही प्रक्रिया करू आणि हे पाणी शेतकऱ्यांना वापरायला देऊ अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची योजना सुद्धा भविष्य काळामध्ये या शासनाच्या माध्यमातून ही योजना मंजुरीच्या मार्गावरती आहे. दवाखान्यासाठी जागा उपलब्ध आहे आपल्याला मंजुरी द्यावी. बोधन-मुखेड -लातूर रोड या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे आपण महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पामध्ये या मार्गाला आपण समावेश करून दिला तर हा रेल्वे मार्ग लवकर होऊ शकतो. कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेडच्या विस्तारीकरण गरजेचे आहे. बिज गुणन केंद्र कृषी विभागाची जागा उपलब्ध आहे यापैकी दहा हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. लेंडी आंतरराष्ट्रीय प्रकल्प आपल्या आशीर्वादामुळे मार्गी लागला परंतु अनुदानाची काही पैसे अजून शेतकऱ्यांनी द्यायचे बाकी आहेत त्यासाठी लेंडी धरणाला वरील तरतूद करावी व याच्या प्रश्नाला अनुषंगाने आपण एक पद्धतीचा आयोजन करून हे सर्व प्रश्न आपण मार्ग लावावे. नगरपालिका निवडणुकीमध्ये एक नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे 19 उमेदवार येत्या 20 तारखेला मुखेडच्या जनतेच्या आशी र्वादाने बहुमताने जिंकतील असा विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो असेही मुख्यमंत्र्यांना आमदार डॉ.तुषार राठोड संबोधित केले.
यावेळी दशरथराव लोहबंदे, वसंतराव संबुटवाड, डॉ. रामराव श्रीरामे, रामेश्वर इंगोले यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवीण साले, गौतम काळे, नासर पठाण, सदाशिवराव पाटील जाधव, विलास कोडगिरे, शिवाजी गेडेवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार यशवंत बोडके यांनी मानले.

