फुलवळ (धोंडीबा बोरगावे)
मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे कंधार तालुक्यातील फुलवळ मराठी पत्रकार संघानेही तो आज मोठ्या उत्साहात साजरा करतांना वृक्षारोपण करून बाळशास्त्री जांभेकर यांना नम्रपूर्वक अभिवादन केले.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिले पत्रकार भवन निर्माण केलेल्या फुलवळ पत्रकार संघाकडून हा पत्रकार दिनाचा सोहळा सरपंच प्रतिनिधी नागनाथराव मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रथमतः दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तदनंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार होताच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने संपूर्ण पत्रकारांचा शाल , पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.
फुलवळ पत्रकार संघाकडून याच जि . प. कें. प्रा. शाळेच्या आवारात अनेक रोपट्यांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व एकजुटीचा सामुदायिक संकल्प करत निर्भीड पत्रकारिता करतांना लेखणीच्या माध्यमातून गरजू , उपेक्षित , वंचितांना न्याय मिळवून देत गाव व समाज विकासासाठी सकारात्मक बातम्या छापून लेखणीची धार कायम तेज ठेवत पत्रकारितेवरील विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प ही करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे सल्लागार डॉ. प्रदीपसिंह राजपूत यांनी केले तर पत्रकार विश्वांभर बसवंते यांनी आपल्या मनोगतातून फुलवळ पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा मांडला. सूत्रसंचालन वीरभद्र मठपती यांनी तर आभार के. एच. पांचाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कामजी मंगनाळे , गवळे सर , पुराणिक मॅडम , गवळे मॅडम , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर फुलवळे , उपाध्यक्ष आखिल निचलकर , माजी अध्यक्ष मंगेश पांचाळ व त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर डांगे , उपाध्यक्ष होनाजी शेळगावे , सचिव धोंडीबा बोरगावे , कार्याध्यक्ष ॲड . उमर शेख , पत्रकार मधुकर डांगे , पत्रकार विश्वाम्भर बसवंते , शादुल शेख आदी पत्रकारासह कु. आराध्या डांगे , बालाजी बोरगावे , शेषेराव सोमासे , बालाजी कांबळे , हिराकांत मंगनाळे केशव बसवंते , संजय डांगे आदींची उपस्थिती होती.

