नांदेड, दि. 6 जानेवारी : नांदेड जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपसंपादक अलका पाटील, वरिष्ठ लिपिक काशिनाथ आरेवार, लिपिक टंकलेखक अनिल चव्हाण, शिपाई गंगाधर निरडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, ज्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो. ते एक समाजसुधारक, शिक्षक, इतिहास संशोधक आणि लेखक होते. याप्रसंगी सर्वांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
oooo

