कंधार : (दिगांबर वाघमारे )
लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद कलंबर सर्कल (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून MRS पक्षाच्या उमेदवार म्हणून सौ. पुष्पाताई शिवराज धोंडगे यांचे नाव मतदारांकडून प्रथम स्थानावर आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून शिवराज धोंडगे व दिलीप दादा धोंडगे यांनी सर्व मतदार संघ पिंजून काढला असून सौ पुष्पाताई शिवराज धोंडगे या विजयाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे शिखर शिंगणापूर येथील मोठा महादेव या देवस्थानाला सहकुंटूंब भेट देवून दर्शन घेतले. यावेळी शिवराज पाटील धोंडगे यांनी सपत्नीक अभिषेक करून सौ. पुष्पाताई शिवराज धोंडगे यांच्या विजयासाठी साकडे घातले.
श्री #शिखर #शिंगणापूर
मोठा महादेव #सोमवार सह कुटुंब दर्शनाचा योग धोंडगे परीवाराला लाभला.
कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥असे शंभू महादेवाला साकडे घालत अभिषेक केला.
सौ पुष्पाताई शिवराज धोंडगे ह्या माजी आमदार तथा MRS पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांच्या सुनबाई होत. त्यांनी कलंबर सर्कलमधील कलंबर, मोकळेवाडी, गुंडेवाडी, मलकापूर, रायवाडी, गोलेगाव पक, गोलेगाव वाडी, गोधनीतांडा, निळा, शेलगाव, पोखरी, धानोरा, चोंडी, हाडोळी, धावरी किरोडा यासह सर्व कलंबर सर्कलमध्ये शिवराज धोंडगे व दिलीप दादा धोंडगे यांनी भेटीगाठी घेत समस्या जाणून घेतल्या.
माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांच्या कार्यकाळात झालेल्या बंधारे, सिंचन प्रकल्प, धरण मंजुरी आदी विकासकामांमुळे शेतकरी वर्गात निर्माण झालेला विश्वास हा सौ. पुष्पाताईंच्या विजयासाठी सकारात्मक बाजू ठरणार आहे.

#mothamahadev #shikharshinganapur —feeling grateful.

