मुखेड: (दादाराव आगलावे)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित शिक्षक, अधिकारी व कर्मचारी विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दयानंद महाविद्यालय, लातूर येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली येथील उपक्रमशील, सक्रिय, तंत्रस्नेही शिक्षिका, उत्कृष्ट सुलभक सौ. अश्विनी कोतवाड मॅडम यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020’ या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करून 25 स्पर्धकातून पाचवा क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे. व रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
उपक्रमशील शिक्षिका सौ.अश्विनी कोतवाड मॅडम यांनी विद्यालयात विद्यार्थीनींना अध्यापनासह सातत्याने विविध उपक्रम राबवून वक्तृत्व, कथाकथन, निबंध लेखन, सामान्य ज्ञान, लोकनृत्य, भूमिका अभिनय, जिल्हा स्काऊट मेळावा इ. स्पर्धेत विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून अनेक पारितोषिके प्राप्त केले आहेत. विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून मागच्या वर्षी राज्यस्तरीय भूमिका अभिनय स्पर्धा एससीईआटी पूणे येथे सहभागी केले होते.
विद्यार्थीनींना राज्यस्तरापर्यंत झेप घेण्यासाठी मार्गदर्शन केल्यानंतर आज मॅडमनी स्वतः शिक्षक, अधिकारी विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून लातूर, धाराशिव व नांदेड या तीन जिल्ह्यातील 25 स्पर्धकातून पाचवा क्रमांक प्राप्त केला व रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या यशाबद्दल लातूर विभागाचे सहसंचालक दत्तात्रय मठपती, जि.प.नांदेड शिक्षणाधिकारी (प्रा.) वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, बिलोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बालाजी पाटील साहेब, बिलोली केंद्राचे केंद्रप्रमुख जयवंत काळे, जिल्हा समन्वयक सौ. सविता अवातिरक (जाधव), विषय तज्ञ गुणवंत हलगरे, श्री राठोड सर, मुख्याध्यापिका सौ.गजरा सावळे मॅडम, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीनीं अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

